कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुश्ताक अहमद जरगर पहलगाम हल्ल्यात सामील

06:24 AM May 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एनआयएच्या चौकशीत समारे आले नाव 

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

Advertisement

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे. दहशतवादी पर्यटनस्थळावर सहजपणे कसे पोहोचले आणि हल्ल्यानंतर कसे निघून गेले याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. परंतु या हल्ल्याचा तपास करणाऱ्या एनआयए टीमने महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. दहशतवादी संघटना अल उमर मुजाहिदीनचा म्होरक्या मुश्ताक अहमद जरगरची या हल्ल्यात भूमिका असल्याचे टीमने सांगितले आहे.

या हल्ल्यात अल उमर मुजाहिदीनची मोठी भूमिका असू शकते. या दहशतवादी संघटनेच्या हस्तकांनी पहलगाम हल्ल्याच्या ओव्हर ग्राउंड वर्कर्सना मदत केली होती असे एनआयएकडून सांगण्यात आले. या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मुश्ताक अहमद जरगरला हा कंधार अपहरणादरम्यान मसूद अझहरसोबत भारत सरकारकडून मुक्त करण्यात आले होते. मुश्ताक सध्या पाकिस्तानात वास्तव्यास आहे. यासंबंधीचा खुलासा  अटक करण्यात आलेल्या ओव्हरग्राउंड वर्कर्सच्या चौकशीत झाला आहे.

जरगरच्या दहशतवादी संघटनेवर भारत सरकारने बंदी घातली आहे. जरगर सध्या पाकिस्तानात असला तरीही श्रीनगरचा असल्याने ओव्हर ग्राउंड वर्कर्सच्या समर्थकांमध्ये त्याचा मोठा प्रभाव आहे. याचमुळे पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जरगरची मोठी भूमिका राहिली असल्याचे मानले जात आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरच्या अनेक प्रतिबंधित संघटना तपास यंत्रणेच्या रडारवर आहेत. अनेक गुन्हेगार/दहशतवादी एनआयएच्या कोठडीत आहेत. 100 हून अधिक ओव्हर ग्राउंड वर्कर्सच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. 90 हून अधिक ओव्हर ग्राउंड वर्कर्सच्या विरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article