मरेचा हार्डकोर्टवरील 500 वा विजय
06:51 AM Feb 28, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ दुबई
Advertisement
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या दुबई खुल्या पुरूषांच्या टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत ब्रिटनच्या 36 वर्षीय अँडी मरेने विजयी सलामी देताना कॅनडाच्या डेनिस शेपोव्हॅलोव्हचा पराभव केला. सदर स्पर्धा हार्डकोर्टवर खेळविली जात आहे. हार्डकोर्टवरील स्पर्धेतील मरेचा हा 500 वा विजय आहे.
Advertisement
पहिल्या फेरीतील सामन्यात मरेने शेपोव्हॅलोव्हचा 4-6, 7-6 (7-5), 6-3 असा पराभव करत दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. एटीपी टूरवरील स्पर्धेत हार्डकोर्टवर 500 सामने जिंकण्याचा पराक्रम यापूर्वी स्विसच्या रॉजर फेडररने, सर्बियाच्या जोकोविचने, अमेरिकेच्या आंद्रे अॅगास्सीने आणि स्पेनच्या राफेल नदालने केला आहे. आता या यादीमध्ये ब्रिटनच्या अँडी मरेचाही समावेश झाला आहे.
Advertisement
Next Article