महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

चिमुकल्यांच्या खून : पित्याला जन्मठेप

11:52 AM Jul 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कंग्राळी खुर्द येथील घटनेचा निकाल : नैराश्यातून केले होते कृत्य

Advertisement

बेळगाव : घरासमोर उतारा टाकल्याच्या संशयातून मानसिक तणावाखाली जाऊन अंधश्रद्धेतून पोटच्या दोन मुलांचा खून केलेल्या पित्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अनिल चंद्रकांत बांदेकर (रा. रामनगर, कंग्राळी खुर्द) असे त्या आरोपीचे नाव आहे. एपीएमसी पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत येणाऱ्या कंग्राळी खुर्द येथे 2021 मध्ये अनिल बांदेकर याच्या घरासमोर उतारा टाकण्यात आला होता. यामुळे तो नैराश्य झाला होता. यामधून अंधश्रद्धेच्या आहारी गेला होता. या कृत्यातून त्याने आपल्या पोटच्या अंजली (8 वर्षे), अनन्या (4 वर्षे) या दोन्ही मुलींना विष पाजवून खून केला होता. या घटनेनंतर पत्नी जया बांदेकर हिने एपीएमसी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती.

Advertisement

पोलिसांनी भादंवि 302 अन्वये गुन्हा दाखल केला होता. तत्कालिन एपीएमसीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ यांनी पुढील तपास करून न्यायालयात दोषारोप दाखल केले होते. न्यायालयामध्ये साक्षी, पुरावे तपासण्यात आले. त्यामध्ये अनिल हा दोषी आढळल्याने सहावे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने अनिलला जन्मठेपची शिक्षा सुनावली आहे. याचबरोबर 20 हजार रुपये दंड ठोठावला आहे. या खटल्यात सरकारी वकील म्हणून नसरीन बंकापूर यांनी काम पाहिले आहे. या प्रकरणामध्ये शिक्षा झाल्यामुळे पोलिसांनी योग्यप्रकारे तपास करून न्यायालयासमोर पुरावे दाखल केले होते. याबद्दल पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी तपास अधिकारी, पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ व वीरभद्र बुदन्नवर यांचे कौतुक केले आहे.

घटनेमुळे बेळगावसह तालुक्यात उडाली होती खळबळ

दोन चिमुकल्यांचा पित्यानेच जीव घेतल्याने संपूर्ण बेळगाव शहरासह तालुक्यामध्ये खळबळ उडाली होती. या मुलींच्या पित्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी साऱ्यांचीच मागणी होती. त्यानुसार त्या मुलींच्या आईने पोलीस स्थानकात न डगमगता तक्रार दाखल केली. याचबरोबर न्यायालयात साक्षही नोंदवली. यामुळे पित्याला शिक्षा झाली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article