For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हुबळीतील ‘तरुणीची हत्या’ राज्य सरकारचे अपयश : शेट्टर

10:06 AM Apr 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
हुबळीतील ‘तरुणीची हत्या’ राज्य सरकारचे अपयश   शेट्टर
Advertisement

बेळगाव : हुबळी येथे नेहा हिरेमठ या तरुणीची झालेली हत्या, बेळगाव जिल्ह्यात झालेला लव्ह जिहादचा प्रकार हे काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारचे अपयश आहे. एका विद्यार्थिनीची हत्या होते आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे प्रकरण वैयक्तिक असल्याचे वक्तव्य करतात. हिंदू विरोधी राज्य सरकारला येत्या निवडणुकीत जागा दाखवून दिलीच पाहिजे, असा घणाघात भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी केला. मंगळवारी सायंकाळी बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या गांधी भवन येथे आयोजित मेळाव्यात त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. यापूर्वी राज्यात महिलांना कुठेही फिरण्याचे स्वातंत्र्य होते. परंतु सध्या महिलांवरील अत्याचार, हत्या असे प्रकार वाढले आहेत. राज्य सरकार अल्पसंख्याकांना खूष करण्यासाठी नेहाच्या घरी सांत्वन करण्यासाठी पोहोचले नसल्याचे त्यांनी सांगितले. भाजपचे राज्य प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके म्हणाले, मागील दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात विकासाचे नवे मॉडेल सुरू केले, असे सांगितले. सध्याच्या सरकारकडे योजनांसाठी पैसा नसल्याने अनेक महत्त्वाच्या योजना बंद असल्याचा हल्लाबोल माजी राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे यांनी केला. यावेळी माजी आमदार संजय पाटील, खासदार मंगला अंगडी, हनुमंत निराणी, महांतेश कवटगीमठ, डॉ. रवि पाटील व इतर उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.