महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कारागृहातून थेट मोबाईलवर व्हिडीओ! दहशतीचा प्रयत्न; गुंड कुमार गायकवाडच्या खूनातील संशयिताचा प्रताप

01:11 PM Dec 22, 2023 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

पोलीस, कारागृह प्रशासन हादरले

कोल्हापूर प्रतिनिधी

कुख्यात गुंड कुमार गायकवाड याच्या खूनातील मुख्य संशयीत अमर माने याच्यासह साथीदारांनी थेट कारागृहातूनच दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. अमर मानेसह त्याच्या साथीदारांनी कारागृहात बसूनच करत व्हिडीओ केल्याने पोलीसांसह कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा कारागृहात कैद्यांकडून मोबाइलचा खुलेआम वापर होत असल्याचे स्पष्ट झाले असून, कारागृहातील कारभार समोर आला आहे.

Advertisement

याबाबत अधिक माहिती अशी की, राजेंद्रनगर येथील गुंडांच्या दोन टोळ्यांमधील संघर्षातून कुमार गायकवाड याचा नोव्हेंबर 2022 मध्ये टाकाळा येथे चौघांनी पाठलाग करून धारदार शस्त्राने निर्घृण खून केला होता. त्या गुह्यातील प्रमुख संशयित अमर माने याच्यासह चौघांना पोलिसांनी अटक केली असून, सध्या ते कळंबा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. टोळीप्रमुख अमर माने व त्याच्या साथीदारांचे कारागृहातील काही फोटो आणि त्यावरून तयार केलेले व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. हे व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर उपलब्ध असून, एक लाखाहून अधिक लोकांनी ते पाहिले आहेत. थेट कारागृहात दबदबा निर्माण केल्याचा आणि विरोधकांना चिथावणी देणारा मजकूर यातून व्हायरल केला आहे. गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित असलेल्या काही तरुणांनी हे व्हिडिओ स्टेटसला लावले आहेत.

Advertisement

कारागृहात मोबाईलचा उघड वापर
व्हायरल झालेला व्हिडिओ कळंबा कारागृहातील आहे, की जिल्हा कारागृहातील आहे हे स्पष्ट झालेले नाही. या प्रकारामुळे कारागृहात कैद्यांकडून राजरोसपणे मोबाइल वापरले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत कळंबा कारागृह प्रशासनाला विचारणा केली असता, फोटो आणि व्हिडिओची तपासणी करून पुढील चौकशी केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

वक्त का इंतजार करो जनाब ....
अमर माने व त्याच्या साथीदारांनी विरोधी टोळीस थेट कारागृहातूनच आवाहन दिले आहे. यामध्ये वक्त का इंतजरा करो जनाब...नजारा देखने लायक होगा यासह पोस्ट व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. 1 लाख लोकांहून अधिकांनी पाहिला आहे. या व्हिडीओमध्ये अमर मानेसह त्याचे साथीदार दिसत असून कळंबा मध्यवर्ती कारागृहातून असा मजकूर याच्यावर दिसत आहे.

Advertisement
Tags :
Amar Manemurder of Kumar GaikwadTarun Bahrat Newsterrorized from jail
Next Article