निपाणीत गुंडाचा खून
कर्नाटक-महाराष्ट्रात अशरफअलीविरोधात गंभीर गुन्हे : बेळगाव पोलिसांनीही केले होते तडीपार
प्रतिनिधी/ निपाणी
गुन्हेगार अशरफअली नगारजी यांच्या वाढत्या गुन्हेगारी कारनाम्याची निपाणी पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली. त्यांच्याविरोधी तडीपारचा प्रस्ताव तयार करून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्याकडे पाठविला. त्या प्रस्तावाची छाननी करत त्याला गेल्यावर्षी निपाणीतून तडीपार केले होते. त्याचा जुलै महिन्यात तडीपारची मुदत संपल्याने तो पुन्हा निपाणीत राहण्यासाठी आला होता. यादरम्यान त्याची काही तऊणांबरोबर वादावादी झाली होती. या घडल्या प्रकारानंतर त्यांच्यावर त्या तऊणांचे टोळके चिडून होते.
तो बुधवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास निपाणी येथील भिमनगरातील म्युन्सिपलच्या उर्दू हायस्कूल ये ?? आला होता. यावेळी दुचाकीवऊन आलेल्या तरुणाच्या टोळक्याने त्याला गाठले. त्यांच्यावर अचानक धार-धार हत्याराने खूनी हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी होवून जमीनीवर कोसळला. त्यानंतर हल्लेखोर तऊणांनी तो मृत झाला असावा, असे समजून घटनास्थळावऊन त्वरीत पलायन केले. या घडल्या घटनेची माहिती त्यांच्या नातेवाईकांना समजली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्याला उपचारासाठी निपाणीतील महात्मा गांधी ऊग्णालयात दाखल केले. पण त्यांची प्रकृती गंभीर बनली. त्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूरातील सीपीआर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला.
हल्लेखोर टोळक्याने केलेल्या धार-धार हत्याऱ्याचे गुन्हेगार अशरफअली यांच्या डोक्यावर व दोन्ही हातावर वर्मी वार करण्यात आले. या वर्मी वारामुळे त्यांचे दोन्ही हात मनगटापासून तुटलेले होते. या घडल्या प्रकाराची माहिती निपाणी शहर पोलिसांना समजली. त्यांनी त्वरीत घटनास्थळी व कोल्हापूरातील सीपीआर हॉस्पीटलमध्ये धाव घेतली. घडल्या प्रकाराची माहिती घेतली. याचदरम्यान पोलिसांना अशरफअल्लीचा खून करणाऱ्या काही हल्लेखोरांची नावे समजली. त्यावऊन पोलिसांनी त्या हल्लेखोराची तात्काळ शोध सुऊ केला. पण गुऊवारी पहाटेपर्यंत त्यांचा शोध लागलेला नव्हता.
अशरफअली यांचा मृत्यु झाल्याची माहिती समजताच कोल्हापूरातील सीपीआर हॉस्पीटलमध्ये त्यांच्या नातेवाईकासह मित्रमंडळीनी धाव घेतली. अनेकांना आपले अश्रु अनावरण झाले. अशरफअल्लीच्या नातेवाईक आणि मित्र मंडळीच्यामुळे बुधवारी रात्री सीपीआरच्या आवारात मोठी गर्दी झाली होती. या खूनाच्या घटनेची नोंद कोल्हापूर सीपीआर पोलीस चौकीत झाली असून, पुढील तपासासाठी हा गुन्हा निपाणी शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.
गुंड अशरफअली विरोधात गंभीर गुन्हे
कोल्हापूर : गुंड अशरफअली नगारजी याच्याविरोधात कर्नाटक राज्यातील निपाणी तसेच महाराष्ट्र राज्यातील विटा (जि. सांगली) अशा पोलीस ठाण्यात गंभीर स्वऊपाचे गुन्हे दाखल आहेत. या दाखल गुन्ह्यामध्ये खून, चेनस्नॅचिंग, मारामारी, चोरी यासारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत. तसेच या गुन्ह्यामधील काही गुन्हे सध्या न्यायप्रविष्ठ आहेत. गुन्हेगार नगारजी ऐन नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला खून झाल्याने निपाणी शहरात एकच खळबळ उडाली आहे.