कांदोळी येथे भाटकाराचा खून
तीक्ष्ण हत्याराने डोक्यावर वार : त्यांचीच कार घेऊन हल्लेखोर पसार
प्रतिनिधी / म्हापसा
ओर्डा कांदोळी येथे वयोवृद्ध भाटकार आरनाल्डो जोसफ सुवारीस (69) यांचा डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार कऊन खून केल्याचे आढळून आले आहे. हल्लेखोराने घराची कौले काढून नायलॉन दोरीच्या साहाय्याने घरात प्रवेश केला. आरनाल्डो व हल्लेखोरामध्ये बरीच झटापट झाल्यानंतर त्याने आरनाल्डो यांचा खून केला असावा. मागील दाराने बाहेर पडत त्याने गॅरेजमधील कार घेऊन पळ काढला. ही कार कांदोळी हेलिपॅडच्या बाजूला ठेवलेली पोलिसांना आढळून आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरनाल्डो हे घरात एकटेच होते. या पोर्तुगीजकालीन घरात सीसीटिव्ही पॅमेरे आहेत, मात्र मुख्य खोलीतील पॅमेरा बंद होता. हल्लेखोराने पूर्वनियोजितरित्या हा खून केल्याचे आढळून आले आहे. मुख्य दरवाज्याने आत न जाता पहाटे 2 वा.च्या सुमारास हल्लेखोराने घराच्या पुढील भागाची कौले काढून वाशांना नायलॉन दोरी बांधून भिंतीच्या साहाय्याने आतमध्ये प्रवेश केला.
भिंतीवर हल्लेखोराच्या पायांचे ठसे उमटलेले होते. हल्लेखोर व आरनाल्डो यांच्यात बरीच झटापट झाल्याचेही घरातील सामानावऊन स्पष्ट होते. घरातील मोठा आरसा तुटलेला आहे. तीक्ष्ण हत्याराने आरनाल्डोच्या डोक्यावर वार कऊन त्यांचा खून केला. खुनासाठी वापरलेले हत्यार घटनास्थळी सापडले नसल्याने नेमका खून कोणत्या हत्याराने केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मोठ्या प्रमाणात जमिनीची विक्री
आरनाल्डो सुवारीस हे मोठे भाटकार असून ते पॅनडा येथे वास्तव्यास होते. अधूनमधून ते कांदोळीला यायचे. आरनाल्डो यांचे मतदान काड?r गोव्यातील नसल्याचे समोर आले आहे. त्यांचे नातेवाईकही पॅनडामध्ये राहातात. कांदोळी येथील डोंगराळ भागातील जमीन तसेच कळंगुट भागातील जमीन विक्रीसाठी ते गोव्यात आले होते. अलिकडच्या काळात त्यांनी लाखो चौरसमीटर जमिनीची विक्री केल्याचे शेजाऱ्यांकडून समजले. काही दिवसांपासून त्यांच्या घरी अनेकजण जमिनीच्या व्यवहारासाठी येत होते. पैशाच्या देवाण घेवाणीतूनच हा खून झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या शेजारी एकमेकांचे नातलग राहत असून ते कुणीही एकमेकांशी बोलत नसल्याचे चौकशीअंती समोर आले आहे.
घटनेची कसून चौकशी करावी : लोबो
आरनाल्डो सुवारीस यांनी कॅनडाचे नागरिकत्व घेतले असून गेली दहा वर्षे ते गोव्यात येऊन जात होते. हा खून करणाऱ्याने आरनाल्डो सुवारीस यांच्याबाबत राग काढून हा खून केला असावा, असा अंदाज आमदार मायकल लोबो यांनी व्यक्त केला आहे. या घटनेची पोलिसांनी कसून चौकशी करावी, असेही ते म्हणाले.
घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी दाखल झाले होते. त्यात पोलीस अधीक्षक अक्षत कौशल, उप अधीक्षक विश्वास कर्पे, निरीक्षक परेश नाईक, गुन्हा अन्वेषण विभागाचे राहूल परब, सोमनाथ माजिक व अन्य पोलीसवर्ग होता.