For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Breaking : अंबप येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून युवकाचा निर्घुण खून

07:53 PM Apr 20, 2024 IST | Abhijeet Khandekar
kolhapur breaking   अंबप येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून युवकाचा निर्घुण खून
Ambap
Advertisement

पेठ वडगाव / प्रतिनिधी

अंबप (ता.हातकणंगले) येथे अमीर करीम मुल्ला (वय ३५) या युवकाचा कुऱ्हाडीचा मानेवर वार करून निर्घुण खून केल्याची घटना सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. अनैतिक संबंधाच्या रागातून हा निर्घुण खून झाल्याची चर्चा घटनास्थळी होती. या घटनेची नोंद वडगाव पोलिसात झाली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी खंडेराव वाघमोडे याला काही तासातच वडगाव पोलिसांनी अटक केली आहे.

Advertisement

या बाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, अंबप (ता.हातकणंगले) येथे अमीर करीम मुल्ला व त्याचे वडील करीम मुल्ला यांचे तलावाजवळ मटण व चिकन विक्रीचे दुकान आहे. आज सकाळी अमीर मुल्ला हा अंबप येथील कापसे पाणंद रस्त्याजवळ घर असलेले वाघमोडे यांच्या घरी मटण विक्रीकरिता बकरे ठरविण्यासाठी गेला होता. तेथून परत येत असताना या रस्त्यात खंडेराव वाघमोडे याने त्याच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केला. यामध्ये प्रचंड रक्तस्त्राव होवून व मान तुटून त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यावर वार करून तेथून खंडेराव फरार झाला. या रस्त्यावर अमीर याचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडल्याची माहिती हळूहळू गावात समजल्यानंतर पोलीस पाटील पंढरीनाथ गायकवाड व मयत अमीर याच्या नातेवाईकांनी यांनी घटनास्थळी धाव घेवून घटनेची खात्री करून वडगाव पोलिसात याची वर्दी दिली. वडगाव पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. मृतदेहाचे शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले. वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास भोसले व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी पंचनामा व साक्षीदार नोंदविले. घटनास्थळी जयसिंगपूर विभागाच्या डीवायएसपी रोहिणी साळुंके यांनी भेट दिली व तपासाबाबत मार्गदर्शन केले.

Advertisement
Advertisement
Tags :

.