साळमळगेवाडीत अनैतिक संबंधातून तरूणाचा निर्घृण खून ! महिनाभरानंतर खुनाचा उलगडा
आठ जणांविरूद्ध खुनाचा व अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल
जत प्रतिनिधी
जत तालुक्यातील साळमळगेवाडी येथे अनैतिक संबंधातून कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील मदभावी येथील 35 वर्षीय निवृत्ती उर्फ आप्पासाहेब सिद्धराया कांबळे या तरूणाचा जबर मारहाण करून खून करण्यात आला आहे. महिनाभरानंतर या खुनाचा उलगडा झाला आहे. 12 ऑगस्ट 2024 रोजी रात्री सव्वा अकरा वाजता साळमाळगेवाडी येथे निवृत्ती यास जबर मारहाण करून त्याचा मृतदेह जत तालुक्यातीलच एकूण्डी क्रॉस येथील बसस्थानकाच्या कट्ट्यावर 13 ऑगस्ट रोजी आढळून आला होता.
याप्रकरणी मयत निवृत्ती याची पत्नी कविता हिने प्रथम अथणी पोलीस ठाण्यात पती निवृत्ती यांचा खून झाल्याची फिर्याद दिली होती. त्यानंतर हा खून अनैतिक संबंधातून झाल्याची माहिती मिळतात मयत निवृत्ती यांची पत्नी कविता यांनी दिलेल्या पुरवणी जबाबात आपल्या पतीचा खून हा अनैतिक संबंधातून झाल्याचा जबाब दिला.
कविता कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनैतिक संबंध ठेवणाऱ्या महिलेचा पती सिद्धाप्पा शिवाप्पा कित्तूर त्याचा भाऊ महादेव शिवाप्पा कित्तूर, (दोघेही राहणार साळमळगेवाडी, ता. जत) त्या महिलेचे भाऊ दिनेश वसंत गडदे अमोल रंगराव गडदे व त्याचे मित्र महादेव कडप्पा गुंडेवाडी, राजकुमार प्रकाश दबडे( चौघेही राहणार- चाबुकस्वारवाडी, ता. कवठेमहांकाळ) तसेच त्या महिलेचे नातेवाईक प्रदीप राजाराम नरूटे, चित्र राजाराम नरूटे (दोघेही राहणार चंद्रपट्टणवाडी, तालुका अथणी, जिल्हा बेळगाव) या आठ जणाविरूद्ध खुनासह अॅट्रसिटीचा गुन्हा दाखल झाला.
कर्नाटकातील बेळगाव पोलीस अधीक्षकांनी सदरची फिर्याद हे सांगलीचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे वर्ग केल्यानंतर सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयाने जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा गुन्हा घडल्याने ही फिर्याद जत पोलीस ठाण्याकडे 16 सप्टेंबर रोजी वर्ग केली. त्यानंतर मंगळवारी 17 सप्टेंबर रोजी कन्नड मधील जबाब मराठीत घेवून वरील आठ जणाविरूद्ध जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत पत्नी कविता कांबळे हिने नमूद केले आहे की, मूळचे कर्नाटकातील अथणी तालुक्यातील मदभावी येथील निवृत्ती कांबळे हे पत्नी कविता हिचे वडील वारल्यानंतर अथणी तालुक्यातीलच शिरूर येथे पत्नी कवितासह राहण्यास होते. जबंगी येथील गणेश शाम वाघमोरे याच्यासोबत निवृत्ती हे मशीन दुऊस्तीच्या कामासाठी आरग येथे रोज मोटार सायकलवरून जात. 12 ऑगस्ट रोजी मयत निवृत्ती व गणेश हे दोघे कामानिमत्त बाहेर आले असता मयत निवृत्ती याने पत्नी कविता हिस मला आज यायला उशीर होईल, काम सुरू आहे, मी उद्या येणार असल्याचे सांगत गणेश सोबत असल्याचे सांगितले.
13 ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता फोन लावला असता फोन लागला नाही. सकाळी नऊ वाजता मदभावी येथील सत्यप्पा कांबळे याने शिरूर येथे मयत निवृत्ती याचा मृतदेह अथणी ते अनंतपूर मार्गावरील एकंडी क्रॉस बसस्थानकाच्या कट्ट्यावर असल्याचे सां†गतले. त्या ठिकाणी गेलो असता सदरचा मृतदेह हा आपला पती निवृत्ती याचा असल्याचे बा†घतले. पती निवृत्ती यास जबर मारहाण करण्यात आली होती. त्याच्या डोक्यावर व संपूर्ण अंगावर जबर मारहाणीचे वळ व गंभीर जखमा होत्या. याप्रकरणी अथणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
मयत निवृत्ती कांबळे यांच्या खून प्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर 17 ऑगस्ट रोजी मयत निवृत्तीचा मित्र गणेश वाघमोरे यांनी मयत निवृत्ती यांची पत्नी कविता व तिच्या आईला निवृत्तीचा खून झाला असून जत तालुक्यातील साळमळगेवाडी येथे आम्ही 12 ऑगस्टला रात्री सव्वा अकरा वाजता गेलो होतो.
साळमळगेवाडी येथील सिद्धाप्पा कित्तूर यांच्या पत्नीने घरी बोलावून घेतले होते. त्यावेळी घरातच दबा धरून बसलेल्या सिद्धाप्पा व त्याचा भाऊ महादेव याने आम्ही घरात जाताच दोघांनाही मारहाण करण्यात आली. मी पळून आलो निवृत्ती यास येथे जमलेल्या लोकांनी जबर मारहाण केल्याचे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी सिद्धाप्पा याची पत्नी चाबुकस्वारवाडी येथे भेटली होती व तिनेच मयत निवृत्ती यास जबर मारहाण करून पती, भाऊ व नातेवाईकांनी ठार मारल्याचे सांगितले. गणेश यांनी दिलेल्या या माहितीनंतर आणि अथणी पोलिसांनी कविता याचा पुरवणी जबाब घेत आठ जणाविरूद्ध गुन्हा दाखल केला.