कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

क्षुल्लक कारणावरून कामगाराचा खून

06:35 AM Mar 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गुडीकट्टी-बैलहोंगल येथील घटना

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

क्षुल्लक कारणावरून दगडाने ठेचून एकाचा खून करण्यात आला आहे. गुडीकट्टी (ता. बैलहोंगल) येथे गुरुवारी ही घटना घडली असून दोडवाड पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. पोलिसांनी त्याच गावातील एका रहिवाशाला ताब्यात घेतले आहे. बसवराज रामण्णा कुंभार (वय 46) असे खून झालेल्या दुर्दैवी इसमाचे नाव आहे. तो मूळचा कटगेरी (ता. गुळेदगुड्ड, जि. बागलकोट) येथील राहणारा होता. मजुरीसाठी तो गुडीकट्टीत आला होता. गावातील बसवराज कल्लय्या पुजेर यांच्या बांधकामावर बसवराज पुंभार काम करीत होता.

किराणा सामान आणण्यावरून झालेल्या वादावादीनंतर बसवराज पुजेरने दोरीने गळा आवळून व दगडाने ठेचून त्याचा खून केला आहे. दोडवाड पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article