For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

मुरलीधर जाधव शिंदे गटात जाहीर प्रवेश करणार; ५ हजार शिवसैनिकांसह पक्षप्रवेश

03:16 PM Feb 16, 2024 IST | Abhijeet Khandekar
मुरलीधर जाधव शिंदे गटात जाहीर प्रवेश करणार  ५ हजार शिवसैनिकांसह पक्षप्रवेश

हुपरी वार्ताहर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून निःस्वार्थी पणाने गेली३५वर्षे कार्य करून देखील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पक्षप्रमुख शिवसेना उबाठा पक्ष यांनी कोणाच्या तरी सांगण्यावरून मला जिल्हाप्रमुख पदावरून कमी केले ही खेदाची गोष्ट आहे. मी आपल्या शिवसैनिक प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पक्षप्रमुख शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे दिला आहे. निष्ठावंत वरिष्ठ नेत्यांचा आदर राखून पक्षासाठी अनेकवेळा रस्त्यावरची लढाई करून प्रसंगी अनेक गुन्हे अंगावर घेतले आहे. माझ्यावर असा अन्याय का केला?अशी चर्चा आजतागायत काही शिवसैनिकातून होत आहे. मी जवळजवळ ५ हजार शिवसैनिक सोबत घेऊन शनिवारी१७रोजी कोल्हापूर येथील शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या महा अधिवेशनात वाजतगाजत जाहीर प्रवेश करणार असल्याचे माजी शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी पत्रकार परिषदेच्यावेळी सांगितले.

Advertisement

मुरलीधर जाधव पुढे म्हणाले की हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचाराने प्रेरित होऊन गेली३०ते३५वर्षे शिवसैनिकापासून ते जिल्हाप्रमुख पदापर्यंत सच्चाईने काम केले आहे.१९ वर्षे जिल्हाप्रमुख, ३ वर्षे तालुकाप्रमुख , ५ वर्षे हुपरी शहरप्रमुख पदावर निष्ठेने व पक्षाच्या आदेशाने कार्य केले आहे. आजपर्यंत देखील नवीन निवड झालेप्रमाणेच मोठया उमेदीने , जोशाने पक्षाचे काम करत होतो. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे माझे दैवत होते, आजही आहेत व कायमच राहतील असे म्हणत असताना. ४ जानेवारी २०२४ रोजी पक्षाने माझ्याबद्दल जो काही निर्णय घेतला व ज्या पद्धतीने निर्णय घेतल्यानंतर व्यथित झाले . एवढे वर्ष पक्षासाठी हाडाची काडे करून पक्ष - संघटना तळागाळात पोहोचविली. " गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक " ही संकल्पना राबवत सहकार पट्टयात शिवसेना रुजविण्यासाठी कष्ट घेतले. अनेक शिवसैनिकांना आंदोलन - मोर्चाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था व गावखेड्यातील मानाची पदे मिळवून देण्यासाठी सातत्याने कष्ट घेतले. पक्षवाढीसाठी रस्त्यावरची लढाई करत प्रसंगी अनेक गुन्हे अंगावर घेतले. खासदार, माजी मंत्री यांच्या घरावर मोर्चे काढलो . पक्षासाठी इतकं करूनही ज्या पद्धतीने, ज्या लोकांच्या सांगण्यावरून हा निर्णय झाला, त्यामुळे माझ्यासह अनेक शिवसैनिक , सामान्य नागरिक व्यथित झाले आहेत.

या सर्व घटनेचा विचार १५ फेब्रुवारी २०२४ रोजी मी शिवसैनिक प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,पक्षप्रमुख--शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना दिले आहे. शनिवारी १७रोजी कोल्हापूर येथे होत असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या अधिवेशनात ५०००शिवसैनिकासह वाजतगाजत जाहीर प्रवेश करणार असल्याचे सांगितले. त्या ठिकाणी देखील सर्वसामान्य लोकांच्यासाठी प्रामाणिकपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,मंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले प्रकारे काम करेन अशी ग्वाही दिली .पत्रकार परिषदेच्यावेळी माजी शिवसेना हुपरी शहरप्रमुख राजेंद्र पाटील,शिवाजी मुरलीधर जाधव, संजय वाईंगडे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Advertisement

Advertisement

Advertisement
Tags :
×

.