महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मनपाचे पथदीपांकडे दुर्लक्ष

11:19 AM Sep 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चक्क पथदीपालाच वेल गुंडाळल्याने परिसरात अंधार 

Advertisement

बेळगाव : स्मार्ट सिटी अंतर्गत शहरामध्ये तसेच उपनगरामध्ये एलईडी लाईट व हॅलोजन लाईट लावण्यात आले आहेत. मात्र त्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. बॉक्साईट रोडवर एका पथदीपच्या खांबावरील पथदीपाला वेलीनेच वेटोळा घातला आहे. त्यामुळे पथदीप असूनही कुचकामी ठरला आहे. यामुळे अंधारदेखील त्या परिसरात पसरला आहे. याकडे महानगरपालिका लक्ष देणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. स्मार्ट सिटीमध्ये रस्ता, गटारी, पथदीप, पाण्याचे पाईप, बसथांबे यांची कामे करण्यात आली. त्यानंतर बहुसंख्य कामांचे हस्तांतर महानगरपालिकेकडे करण्यात आले आहे. कामे पूर्ण झाल्यानंतर त्याच्या देखभालीचे काम महानगरपालिकेकडेचे आहे. अनेक ठिकाणी असलेले पथदीप बंद आहेत. तर काही ठिकाणी अशा प्रकारे वेली, झाडांमध्ये अडकल्या आहेत. त्यांची साफसफाई करणे गरजेचे आहे. मात्र त्याकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. तेव्हा तातडीने बॉक्साईट रोडवरील या पथदीपाला गुंडाळलेली वेल काढावी अशी मागणी होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article