महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महसूल वसुलीमध्ये मनपाची दमछाक

06:50 AM Mar 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

निर्धारित उद्दिष्टापासून अजूनही दूरच : एका महिन्यात 10 कोटींच्या कराचे आव्हान

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

महानगरपालिकेला 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 62 कोटी रुपये महसूल जमा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. फेब्रुवारी अखेरपर्यंत 52 कोटी 29 लाख 25 हजार 750 रुपये इतका महसूल जमा झाला आहे. चालू आर्थिक वर्षातील शेवटच्या मार्च महिन्यामध्ये उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी 10 कोटींचा महसूल वसूल करावा लागणार आहे. त्यामुळे या महिन्यात महसूल गोळा करताना कर्मचाऱ्यांची दमछाक होणार आहे.

नगर प्रशासनाच्यावतीने महानगरपालिकांना महसूल जमा करण्याचे दरवर्षी उद्दिष्ट दिले जाते. ते उद्दिष्ट पूर्ण झाले तरच महानगरपालिकेचा संपूर्ण डोलारा सांभाळला जातो. मात्र, उद्दिष्ट पूर्ण झाले नाही तर आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते. गेल्या अकरा महिन्यांमध्ये बऱ्यापैकी महसूल जमा करण्यात आला असला तरी नियोजित उद्दिष्ट गाठण्यासाठी अजूनही 10 कोटी रुपयांचा निधी कमी पडत आहे. या महिन्यामध्ये ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी धडपडावे लागणार आहे.

फेब्रुवारी महिन्यामध्ये 1 कोटी 98 लाख 4 हजार 041 रुपये इतका महसूल कर रुपाने जमा झाला आहे. त्यामुळे उद्दिष्ट पूर्ण करणे अशक्य असल्याचे दिसून येत आहे. ऑनलाईन पद्धतीने घरपट्टी, तसेच इतर महसूल शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात भरत आहेत. याचबरोबर आस्थापनांकडील थकीत महसूल व घरपट्टीदेखील वसूल करण्यासाठी विभागाचे कर्मचारी धडपड करत आहेत. मात्र, अनेकजण महसूल भरण्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे व काही जणांनी त्याविरोधात न्यायालयात धाव घेतल्यामुळे समस्या निर्माण होत आहे.

चालू आर्थिक वर्षामध्ये 51 कोटी 41 लाख 90 हजार 018 रुपये ऑनलाईन आणि युपीआयद्वारे कर जमा झाला आहे. तर उर्वरित कर सर्वसामान्य जनतेने थेट येऊन भरला आहे. याचबरोबर काही कर कर्मचाऱ्यांनी संबंधितांकडे जाऊन जमा करून घेतला आहे. अनेक व्यावसायिकांचा कर थकीतच आहे. त्यामुळे त्यांच्याकडे हे कर्मचारी वारंवार जाऊन कर जमा करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात 10 कोटी रुपये जमा करावे लागणार आहेत. तर पुढील 2024-25 वर्षासाठी 72 कोटीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article