For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फ्लेक्सबाबत पालिका अ‍ॅक्टीव्ह मोडवर

04:19 PM Jun 23, 2025 IST | Radhika Patil
फ्लेक्सबाबत पालिका अ‍ॅक्टीव्ह मोडवर
Advertisement

वाई :

Advertisement

वाई शहराला अलिकडच्या काळात फ्लेक्सच्या अति वापराने शहर बकाल झाले आहे. शहराचे पर्यटन आणि ऐतिहासिक महत्व फ्लेक्समुळे झोकाळले जात आहे. वाई पालिकेच्या हद्दीत फ्लेक्स लावण्यास कोणतीही नियमावली नाही. कोणीही बॅनर लावतो आहे. त्यामुळे वाई शहरातील सजग नागरिक हे वाई शहरातील बेकायदेशाच्या फ्लेक्सच्या विरोधात उभे ठाकले असून त्याकरता वाई पालिकेच्यावतीने दि. २३ रोजी सकाळी बैठकीचे आयोजन केले आहे. वाई पालिका अॅक्टीव्ह मोडवर असून बेकायदेशीर फ्लेक्सबाबत नियमावली होणार काय?, दंडात्मक कारवाई केली जाणार काय?, नो फ्लेक्स झोन होणार काय?, याकडे उत्सुकता आहे.

वाई शहराला एक वेगळे महत्व आहे. मंदिराचे शहर, ऐतिहासिक शहर, पर्यटनस्थळ अशी ओळख असलेल्या या शहराला अलिकडच्या काळात अवैध प्लेक्सच्या विळख्यात अडकलेले असून अगदी फ्लेक्स लावण्यासाठी चढाओढ लागलेली असते. माझा बॅनर मोठा की तुझा मोठा बॅनर अशी जुनी वाई शहरात स्पर्धाच पहायला मिळते. त्यामध्ये कोणताही नियम वा कोणतीही बंधने प्रशासनानकडून नसल्याने बॅनरसाठी हम करे सो कायदा, थोडेस काय चांगले घडले की लगेच बें नर लागलाच. वाई शहरात एंट्री करताच मिशन हॉस्पिटलच्या समोर छ. शिवाजी महाराजांचे स्मारक उभे रहात आहे त्या स्मारकाच्या समोरच विविध पक्षांचे बॅ नर लागतात. मिशन हॉस्पिटल ते हॉटेल पर्लपर्यंत फुटपाथ आहे त्या फुटपाथवरही बॅ नर लागलेले असतात. स्टॅण्डच्या परिसरात, तिकाटण्यात, त्याचबरोबर छ. शिवाजी महाराज चौक, आमंत्रण चौक, गणपती आळीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या तिकाटण्यात महागणपती मंदिराच्या समोरच, तीन बत्ती रिक्षा थांब्याच्च्यासमोर, वाई पालिकेच्या समोर, गंगापूरी चौकात, सोनगिरवाडीत, पोस्टाच्या समोर, वाई पंचायत समितीच्या समोर, द्रवीड हायस्कूलच्या समोर, किसनवीर चौकात आदी ठिकाणी बॅनर लागले जातात. त्या बॅनरला कोणतीही नियमावली नाही. बॅनरच्या खाली पालिकेची परवानगीची पावती नसते. त्याचबरोबर नो बॅनर झोनही घोषित केलेला नाही. त्यावरुन वाईतले सजग नागरिक यशवंत लेले यांनी वाई पालिकेला आंदोलनाचा इशारा दिला होता. वाई पालिकेने त्यांच्या पत्राची दखल घेवून तक्रारदार, वाई शहरातील बॅनर, फ्लेक्स प्रिंटींग व्यावसायिक, वाई पोलीस, वाई पालिका अतिक्रमण हटाव विभाग आणि तक्रारदार यांची दि. २३ रोजी सकाळी ११ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Advertisement

  • वाई पालिकेच्या समोरच लागतात फ्लेक्स

आधीच वाई शहरात अरुंद रस्ते, त्यातच वाई नगरपालिकेकडे गणपती आळीतून आणि भाजी मंडई, धर्मपूरी, गंगापूरी अशा तीन ठिकाणाहून जाण्यासाठी रस्ते आहेत. तेही अरुंद असे असताना वाई पालिकेच्या समोरच मोठ्या दिमाखात फ्लेक्स लागलेले असतात. त्या फ्लेक्सखाली भाजी विक्री करणारे आपली दुकाने लावत असतात. त्याचबरोबर वाई पालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच फ्लेक्स लागलेले असतात. त्यामुळे पालिकेच्यासमोर लागणाऱ्या बॅनरच्या करातून मिळणाऱ्या उत्पन्नासाठी वाई पालिकेची नियमावली दिसून येते, अशी चर्चा आहे.

Advertisement
Tags :

.