महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पालिका, पंचायतींना झाडे कापण्यास मिळणार निधी

12:37 PM May 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राज्य आपत्ती निवारण प्राधिकरणातर्फे आदेश जारी

Advertisement

पणजी : पावसाळ्यात झाडांचा किंवा त्यांच्या फाद्यांचा धोका होऊ नये म्हणून राज्यातील पालिका, पंचायतीना ती झाडे, फांद्या कापण्यासाठी आर्थिक अनुदान मिळणार आहे. राज्य आपत्ती निवारण प्राधिकरणाने तसा आदेश जारी केला असून जिल्हाधिकाऱ्यांनी ते अनुदान द्यावे असे आदेशात म्हटले आहे. आदेशाप्रमाणे पणजी महापालिका एकच असून तिला ऊ. 1 लाख, ‘ब’ दर्जाच्या पालिकांना ऊ. 50 हजार तर ‘क’ दर्जाच्या पालिकांना तसेच पंचायतींना ऊ. 25 हजार दिले जाणार आहेत. हा निधी देण्यापूर्वी यापूर्वीच्या निधीचे वापर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय हा निधी दिला जाणार नाही, असे आदेशात नमूद आहे. या निधीचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना आदेशातून देण्यात आली आहे. हा निधी पुरवण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाची अनुमती घेण्यात आली असून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता चालू असताना ही मान्यता मिळाल्याचे आदेशात म्हटले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article