मनपातील कर्मचारी हनिट्रॅपच्या जाळ्यात
महिलेने ब्लॅकमेल कऊन 80 हजार ऊपये उकळले
बेळगाव : महानगरपालिकेतील एक कर्मचारी हनिट्रॅपच्या जाळ्यात अडकला आहे.त्याच्याकडून मोबाईलवर व्हिडिओ कॉल आणि व्हाट्सअॅप मेसेजद्वारे बोलणाऱ्या अनोळखी महिलेने ब्लॅकमेल करत 80 हजार ऊपयांची रक्कम उकळली आहे. या घटनेमुळे बेळगावात एकच खळबळ उडाली आहे. राज्यातील काही आमदार हनिट्रॅपमध्ये अडकल्याचा गौप्यस्फोट सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री तथा बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यातच बेळगाव महानगरपालिकेतील एक कर्मचारी देखील हनिट्रॅपच्या जाळ्यात अडकला आहे. आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला पंधरा दिवसांपूर्वी एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून कर्मचाऱ्याच्या मोबाईलवर ‘हाय’ असा मेसेज आला.
त्यामुळे सदर मेसेजला कर्मचाऱ्याने प्रतिसाद देत ‘हॅलो’ असा मेसेज पाठवला. त्यानंतर दोघांमधील संभाषण वाढत गेले. त्यातच रात्रीच्यावेळी अनोळखी महिलेने कर्मचाऱ्याला व्हिडिओ कॉल केला. व्हिडिओ कॉल रिसिव्ह करताच दोघांमधील काही खासगी क्षण महिलेने आपल्या मोबाईलमध्ये शूट केले. त्यानंतर सदर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत. कर्मचाऱ्याकडून पैशाची मागणी करण्यास सुऊवात केली. बदनामीच्या भीतीने कर्मचाऱ्याने फोन पे च्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने 80 हजार ऊपये सदर महिलेला पाठविले. तरी देखील तिच्याकडून ब्लॅकमेल करण्याचा प्रकार सुरूच आहे. त्यामुळे कर्मचाऱ्याने दोघांमध्ये झालेले संभाषण व पाठवलेल्या पैशांची माहिती व पुरावे गोळा करून ठेवले असून याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्याची तयारी चालवली आहे. मनपातील एक कर्मचारी हनिट्रॅप प्रकरणात अडकल्याने महापालिका वर्तुळात खळबळ झाली आहे.