For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Municipal Election 2025: महाविकास की हाळवणकर गट, महापौर पदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी

05:43 PM May 11, 2025 IST | Snehal Patil
municipal election 2025  महाविकास की हाळवणकर गट  महापौर पदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी
Advertisement

इच्छुकांच्या आशेला अखेर न्यायालयाच्या निर्णयामुळे धुमारे फुटलेत

Advertisement

By : विजय चव्हाण

इचलकरंजी : येथे नव्यानेच उदयास आलेल्या इचलकरंजी महापालिकेवर स्थापनेपासूनच प्रशासकराज आहे. सुरुवातीला सहा महिने नगरपालिका व त्यानंतर महापालिका या प्रवासात तब्बल सव्वातीन वर्षे प्रशासकांनी कारभार पाहिला आहे. निवडणुका आज होणार उद्या होणार, या आशेवर असणाऱ्या इच्छुकांच्या आशेला अखेर न्यायालयाच्या निर्णयामुळे धुमारे फुटले आहेत.

Advertisement

महापालिकेच्या पहिल्या सभागृहात पहिले नगरसेवक, महापौर व उपमहापौर होण्यासाठी शहरातील अनेक इच्छुक अलर्ट मोडवर आले आहेत. यापूर्वी पालिकेच्या निवडणुका या प्राधान्याने पक्षीय तसेच आघाड्यांच्या पातळीवर लढल्या गेल्या. पण गत लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये प्राधान्याने महायुती विरूद्ध महाविकास आघाडी यांच्यामध्येच सामना रंगला.

त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीमध्येही हाच सामना रंगणार असल्याचा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. पण सद्यस्थितीत आवाडे-हाळवणकर यांच्यामध्ये रंगलेले शीतयुद्ध, या दोन्ही गटामध्ये असलेली इच्छुकांची संख्या, महाविकास आघाडीत लागलेली गळती, शिवसेना शिंदे गटाचा सवता सुभा आदी सर्व कारणांमुळे ही निवडणूक जरी महायुती विरूद्ध महाविकास आघाडी झाली तरीही यामध्ये मनोमीलन होऊ शकेल, असे कोणीही सांगू शकणार नाही.

ऐनवेळी अनेक पक्ष व आघाड्या एकत्र येऊन वेगळा सुभा मांडण्याची शक्यता आहे. इचलकरंजी महापालिकेचा पहिला महापौर कोण होणार, याबाबत आतापासूनच अटकळ बांधल्या जात आहेत. भाजपकडून लढून आमदारपद मिळवलेल्या आवाडे घराण्यातील कोणीही महापौर होणार नसल्याची घोषणा नुकतीच प्रकाश आवाडे यांनी केली होती.

यामुळे आता महापौर पदासाठी हाळवणकर गटातील अनेकजण इच्छुक आहेत. तर महाविकास आघाडीसह अन्य पक्षातील उमेदवारही महापौरपदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे महापालिकेच्या पहिल्या सभागृहासाठी होणारी ही निवडणूक रंगतदार ठरणार, हे निश्चित.

आगामी महापालिकेसाठी 65 नगरसेवक, 16 प्रभाग

इचलकरंजी शहराची 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ही 2 लाख 92 हजार इतकी असून ही ‘ड’ वर्ग महानगरपालिका आहे. महापालिका अधिनियम 1949 मधील तरतुदीनुसार 3 लाख लोकसंख्या असलेल्या ‘ड’ वर्ग महापालिकेची सदस्यसंख्या 65 इतकी असावी असे नमूद आहे.

यानुसार प्रभागरचना झाल्यास इचलकरंजीमध्ये एकूण 16 प्रभागांची निर्मिती करावी लागणार आहे. यामध्ये 15 प्रभाग हे चार सदस्यीय असणार असून शेवटचा प्रभाग हा पाच सदस्यीय असणार आहे. इचलकरंजीची लोकसंख्या पाहता एका प्रभागात किमान 16 ते कमाल 20 हजार इतकी लोकसंख्या असणार आहे.

Advertisement
Tags :

.