Solapur elections : सोलापूरमध्ये 2 डिसेंबरला नगरपरिषद निवडणुका; संवेदनशील केंद्रांवर कडक बंदोबस्त
संवेदनशील मतदान केंद्रावर प्रशासनाचे संपूर्ण लक्ष : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ११ नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीची निवडणूक सुरु आहे. यासाठी २ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. संवेदनशील केंद्राकडे प्रशासनाचे संपूर्ण लक्ष असून याठिकाणी सीसी कॅमरे व पोलीस बंदोबस्त असणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. मतदानअनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत एका महिला उमेदवाराला उमेदवारी अर्ज भरण्यास मज्जाव केला जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या,
त्यानुसार संबधितांना आवश्यक पोलीस बंदोबस्त देण्यात आला. त्यामुळे उमेदवारास अर्ज दाखल करता आले. जिल्ह्यातील निवडणुका या पारदर्शकपणे आणि निर्भय वातावरणातच पार पडतील, असा विश्वास जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केला आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येकाला निवडणुकीत सहभाग घेण्याचा अधिकार आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन चोख काम करीत आहे. ज्या ठिकाणी नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी संवेदनशील वातावरण आहे. गरज पडल्यास त्या ठिकाणी अधिकचा पोलीस बंदोबस्त देण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.