For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News : दिवाळीच्या तोंडावर सांगलीत महापालिकेची अतिक्रमणविरोधी मोहीम

01:09 PM Oct 12, 2025 IST | NEETA POTDAR
sangli news   दिवाळीच्या तोंडावर सांगलीत महापालिकेची अतिक्रमणविरोधी मोहीम
Advertisement

       वाहतूक विस्कळीत करणाऱ्या मंडपांवर महापालिकेची कारवाई

Advertisement

सांगली : दिवाळीच्या निमित्ताने खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीला विचारात घेऊन व्यापाऱ्यांनी दारात घातलेले पत्राचे मांडव महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी रात्री अकराच्या सुमारास जेसीबीच्या साह्याने तोडून टाकले.

मारुती रोडवरील जवळपास सर्वच दुकानदार दिवाळीच्या निमित्ताने रस्त्यावर छोटे मंडप घालतात. गतवर्षी काही व्यापाऱ्यांनी घातलेले मंडप तीन-चार महिने काढलेच नव्हते. त्यानंतर महापालिकेने अतिक्रमण कारवाई केली होती. रात्रीत जेसीबीच्या साह्याने पत्रे तोडून पालिकेने हे अतिक्रमण हटवले. रात्रीच्या सुमारास दुकान बंद करून चाललेल्या व्यापाऱ्यांनी, हे पाहण्यासाठी गर्दी केली होती.

Advertisement

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत वाढलेली गर्दी आणि वाहतुकीस होणारा अडथळा लक्षात घेऊन महापालिकेने अतिक्रमण हटावाची मोहिम तीव्र केली आहे. दुकानदारांनी विनापरवाना आणि मर्यादित जागेपेक्षा अधिक जागेवर घातलेले मंडप काढून टाकण्यात येत असून दुकानदारांना दहा फुटापर्यंत मंडप घालता येतील मारूती रोडवर मध्ये कोणीही बसून विक्री करू नये. अन्यथा गुन्हे दाखल केले जातील असा इशारा आयुक्तांनी दिला.

Advertisement
Tags :

.