For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महात्मा फुले भाजी मार्केटमधील मनपाने गाळे घेतले ताब्यात

06:33 AM Jun 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
महात्मा फुले भाजी मार्केटमधील  मनपाने गाळे घेतले ताब्यात
Advertisement

सहा गाळे, दोन गोडावून ताब्यात घेऊन दिला दणका

Advertisement

► प्रतिनिधी/ बेळगाव

महात्मा फुले भाजी मार्केट येथील काही दुकानगाळेधारकांनी बेकायदेशीररित्या कब्जा ताब्यात ठेवला होता. त्याविरोधात शनिवारी महानगरपालिकेने अचानकपणे तेथे जाऊन गाळे ताब्यात घेतले आहेत. यामुळे बेकायदेशीररित्या गाळे घेणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Advertisement

महानगरपालिकेने महात्मा फुले भाजी मार्केटमधील गाळे 2022 साली लिलाव केले होते. मात्र पूर्वीच्या भाडेकरूंनी ते गाळे सोडण्यास नकार दिला होता. तसेच टाळाटाळ केली होती. त्यामुळे नव्याने घेतलेल्या गाळेधारकांना नाहक त्रास सहन करावा लागला. एकतर लिलावामध्ये रक्कम देऊनही गाळे दिले नव्हते. त्यामुळे त्यांना फटका बसला. अखेर शनिवारी महानगरपालिकेच्या महसूल विभागाने गुप्तपणे त्या ठिकाणी धाड टाकली. त्यानंतर तेथील गाळे खाली करून घेतले.

महात्मा फुले मार्केटमधील वाद न्यायालयामध्ये सुरू आहे. या गाळ्यांसंदर्भात दावे-प्रतिदावे केले जात आहेत. महानगरपालिकेनेच ही इमारत उभी केली आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातूनच आतापर्यंत गाळे लिलाव होत असतात. मात्र अचानकपणे काहीजण त्याठिकाणी फलक लावून आपलेच गाळे आहेत, असे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. याबाबत नुकत्याच झालेल्या मनपाच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये जोरदार चर्चा झाली होती. शनिवारी महात्मा फुले मार्केटमधील सहा गाळे आणि दोन गोडावून खाली करण्यात आले.

महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी महानगरपालिकेचे कायदा सल्लागार अॅड. उमेश महांतशेट्टी, महसूल अधिकारी संतोष आन्निशेट्टी, महसूल निरीक्षक नंदू बांदिवडेकर यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.