For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॅन्टोन्मेंट बोर्डला 4 कोटींचा निधी मंजूर

11:45 AM Jul 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
कॅन्टोन्मेंट बोर्डला 4 कोटींचा निधी मंजूर
Advertisement

वेतन-पेन्शन अदा होणार का? कर्मचारी प्रतीक्षत्sा

Advertisement

बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डला चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. येत्या दोन दिवसांत हा निधी कॅन्टोन्मेंट बोर्डकडे वर्ग होणार आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यांमध्ये कर्मचारी व पेन्शनधारकांचे थकीत वेतन दिले जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दोन महिन्यांचे निम्मे वेतन देण्यात आल्याने कर्मचारी व पेन्शनधारकांचे हाल होत असल्याने लवकरच वेतन जमा करण्याची मागणी केली जात आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डला कर्मचाऱ्यांचा पगार करण्यासाठी प्रत्येक महिन्यात राखीव निधी ठेवावा लागतो. मागील दोन महिन्यांत निधीची कमतरता असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे निम्मे वेतन करण्यात आले होते. प्रत्येक महिन्याच्या अखेरीला त्या महिन्याचे वेतन कर्मचारी व पेन्शनधारकांच्या खात्यामध्ये जमा केले जाते. परंतु मे महिन्याचे वेतन अर्धे देण्यात आले तर उर्वरित वेतन जून महिन्याच्या मध्यावर जमा करण्यात आले.

Advertisement

यामुळे अजून जून महिन्याचे वेतन येणे बाकी आहे. पूर्ण पगार मिळत नसल्याने कर्मचारी व पेन्शनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. बँकांचे हप्ते व इतर खर्च वगळता कर्मचाऱ्यांच्या हातात काहीच शिल्लक राहात नसल्याने वेळच्यावेळी वेतन जमा करण्याची मागणी कर्मचारीवर्गातून केली जात आहे. त्यामुळे चार कोटी अनुदान जमा झाल्यास कर्मचाऱ्यांचे वेतन दिले जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महिन्याला वेतनासाठी दीड कोटी रुपये 

कॅन्टोन्मेंट बोर्डमधील शिपाई ते ऑफिस असिस्टंट पदापर्यंतचे कर्मचारी व निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी महिन्याकाठी 1.50 कोटी रुपये जमा करावे लागतात. 4 कोटी रुपयांचा निधी कॅन्टोन्मेंट बोर्डला नुकताच मंजूर करण्यात आला. या निधीची रक्कम दोन दिवसांत जमा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे 4 कोटींपैकी 1.50 कोटी रुपये वेतन तर उर्वरित रक्कम विकासकामांवर खर्च होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.