For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur News : सोलापुरात महापालिकेकडून शाळेची अतिक्रमित संरक्षक भिंत उद्ध्वस्त

04:55 PM Oct 08, 2025 IST | NEETA POTDAR
solapur news   सोलापुरात महापालिकेकडून शाळेची अतिक्रमित संरक्षक भिंत उद्ध्वस्त
Advertisement

           नवजीवन स्कूलचे अतिक्रमण जेसीबीने हटवले; चारजण ताब्यात

Advertisement

सोलापूर : मजरेवाडी येथील आपलानगर येथे असलेल्या नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूलची अतिक्रमित भिंत जेसीबीने पाहून टाकण्याची कारवाई मंगळवारी महापालिकेकडून करण्यात आली. ही कारवाई करताना मोठा विरोध झाला मात्र पोलिसांनी आपल्या बळाचा वापर करत चारजणांना ताब्यात घेतले.

महानगरपालिकेच्या बांधकाम, नगररचना व अतिक्रमण विभागाकडून मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. आपलानगर परिसरात नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूल आहे. या शाळेने मूळ बांधकाम आराखड्याच्या बाहेर जाऊन रस्त्यावर संरक्षक भिंत व पत्राशेड असलेले कार्यालय उभारले होते. हे अतिक्रमण काढून टाकण्याबाबत महापालिकेकडून यापूर्वी नोटीस देण्यात आली होती, मात्र शाळेने स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले नाही. यामुळे मंगळवारी महापालिकेच्यावतीने ही कारवाई करण्यात आली.

Advertisement

एमआयडीसी पोलीस ठाणे तसेच अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. सकाळी कारवाई करण्यासाठी महापालिकेचे पथक शाळेजवळ गेले असता अतिक्रमण काढायला शाळेशी संबंधितलोकांकडून जोरदार विरोध करण्यात आला. काही महिला तसेच विद्यार्थ्यांकडूनदेखील विरोध झाला, मात्र पोलिसांनी कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्या चार जणांना आपल्या बळाचा वापर करून ताब्यात घेतले. यानंतर बंदोबस्तात शाळेची संरक्षक भिंत जेसीबीने उद्ध्वस्त करण्यात आली.

१० या कारवाईमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होता, मात्र पोलिसांच्या योग्य बंदोबस्तामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. दरम्यान शाळेचे पत्राशेडमध्ये असलेले कार्यालय काढून टाकण्यास महापालिकेकडून शाळेला दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

या मुदतीत अतिक्रमण न काढल्यास ऑक्टोबर रोजी महापालिकेकडून कारवाई करण्यात येईल, अशी सूचना देण्यात आली आहे. कारवाई मोहिमेत महापालिका बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता इर्शाद जरतार, कनिष्ठ अभियंता प्रमोद गोविंदवार, दिपाली मिटकरी, गणेश काकडे, अतिक्रमण विभागाचे अधिकारी हेमंतकुमार डोंगरे, कनिष्ठ अभियंता दीपक कुंभार, सुफियान पठाण आदी सहभागी झाले होते.

Advertisement
Tags :

.