कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महानगरपालिकेकडून नालेसफाईला सुरुवात

12:05 PM Mar 11, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

पावसाळ्यात नाले तुंबून पाणी रस्त्यावर येऊन निर्माण होणारी आपत्कालीन परिस्थिती होऊ नये म्हणून महापालिकेकडून शहरात नालेसफाई ची कामे सुरु झाली असून त्यासाठी पालिकेकडून दोन टीम तयार करण्यात आल्या असून सध्या प्रभाग क्रमांक 1 व सानेगुरुजी वसाहत येथुन नाले सफाई सुरुवात करण्यात आली आहे. जे मोठे नाले आहेत त्यासाठी आवश्यक अशा मशिनरी ची निविदा काढण्यात आली असून त्यासाठी 29 लाखाचा खर्च अपेक्षित आहे. या नालेसफाई मध्ये पावसाच्या पाण्याच्या मार्गातील अडथळे दूर करुन गटाराबरोबरच निमुळत्या नाल्याची रुंदी वाढविण्यासाठी तेथील अडथळे आणि भराव काढून टाकणे अशी कामे करण्यात येणार आहेत.

Advertisement

शहरात पावसाळ्याच्या दिवसात नाले तुंबून पाणी रस्त्यावर येण्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे महापालिक़ेकडून दरवर्षी नालेसफाईच्या कामांना सुरूवात करण्यात येते. व ही कामे 31 मे पुर्वी पुर्ण होणे अपेक्षित असते. मात्र, मोठ्या नाल्यातील सफाई साठी आवश्यक पोकलॅड ची
निविदा प्रक्रीया सुरु असुन मोठ्या नाल्याच्या सफाईच्या कामांना लवकरच सुरूवात होणार आहे
. यामुळे 31 मे पर्यंतच्या मुदतीत ही कामे पुर्ण होतील का यात शंका आहे. काहीवेळेस पावसाळा सुरू झाला तरी नालेसफाईची कामे सुरूच असतात. यावरून पालिकेच्या प्रशासनावर टिका होत असते. हि बाब लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने यावर्षी मार्च महिन्यातच नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली आहे. महानगरपालिकेच्या दोन टीम मार्फत 70 कर्मचारी 2 जेसीबी व 2 डंपरच्या सहाय्याने हे काम चालु असुन पावसाळ्यापुर्वी नालेसफाईची कामे पुर्ण व्हावीत यासाठी मार्चपासून कामाचे नियोजन आखले आहे. कोल्हापूर महानगरपालिकेने गेल्यावर्षी नालेसफाईसाठी 28 लाख रुपये खर्च केले होते. यंदा पालिकेने 5 टक्के वाढ अपेक्षित धरली असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा नालेसफाईच्या कामांच्या खर्चात वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे.

एकूण 70 कर्मचारी

2 जेसीबी

2 डंपर

2 पोकलॅड

एकूण 276 ठीकाणी नालेसफाई

जेसीबीच्या सहाय्याने 236 ठिकाणी

20 कीमी परिसरात पोकलॅड ने सफाई

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article