महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मनपाचा 436.61 कोटीचा अर्थसंकल्प मंजूर

10:51 AM Feb 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न : अर्थ व कर स्थायी समिती अध्यक्षा वीणा विजापुरे यांनी मांडला अर्थसंकल्प

Advertisement

बेळगाव : महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाकडे साऱ्यांचेच लक्ष लागून होते. मंगळवारी महानगरपालिकेमध्ये 436 कोटी 61 लाख 35 हजार ऊपयांचा अर्थसंकल्प अखेर सादर करण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये सर्वात जास्त तब्बल 60 कोटी रुपयांचा निधी शहराच्या स्वच्छतेसाठी तरतूद करण्यात आला आहे. याचबरोबर 7 लाख 72 हजार ऊपये शिलकी अर्थसंकल्प अर्थ व कर स्थायी समितीच्या अध्यक्षा वीणा विजापुरे यांनी सादर केले आहे. महापौर सविता कांबळे या अध्यक्षस्थानी होत्या. वीणा विजापुरे यांनी 2024-25 चा अर्थसंकल्प वाचताना बेळगाव सुंदरनगर करण्यासाठी सर्वं घटकांना समाविष्ट करुन हा अर्थसंकल्प सादर करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्येष्ठ नागरिक, अनुसुचित जाती-जमाती, दिव्यांग, तळागाळातील सर्व घटकांना न्याय देण्याची तरतूद या अर्थसंकल्पात केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरातून मिळणाऱ्या विविध करातून तो कशा प्रकारे खर्च करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 2024-25 मध्ये 73 कोटी 50 लाख 20 हजार रुपयांची घरपट्टी मिळणार असल्याचे नमूद केले. बांधकाम परवान्यातून 2 कोटी रुपये, बांधकाम परवाना विकास शुल्कातून 10 कोटी 25 लाख, अवशेष निर्मुलनातून 2 कोटी 30 कोटी रुपयांचा महसुल महापालिकेला जमा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. हेस्कॉमकडे 17 कोटी रुपये प्रलंबित आहेत. तेही या महसुल वाढीमध्ये दाखविण्यात आले आहेत. या आर्थिक वर्षात शहर स्वच्छ करण्यासाठी 60 कोटींची तरतूद केली आहे. त्यामध्ये स्वच्छता ठेकेदारांच्या खर्चासाठी 28 कोटी, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 18 कोटी, शहरातील कचऱ्याची वैज्ञानिकपध्दतीने विल्हेवाटीसाठी 4 कोटी, पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी, रस्ते, गटार बांधकामासाठी 10 कोटी 50 लाख रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.

Advertisement

विहिरींच्या दुरुस्तीसाठी 25 लाखाची तरतूद

शहरामध्ये पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी असलेल्या विहिरींच्या कामाच्या दुरुस्तीसाठी 25 लाख रुपये तरतूद करण्यात आली असून एकूण 436 कोटी 53 लाख 63 हजार रुपयांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेला जमा होणारा कर आणि खर्च त्यांनी सादर केला. याचबरोबर 7 लाख 72 हजार रुपये शिल्लक राहतील, असा उल्लेखही विजापुरे यांनी केला आहे. अर्थसंकल्प सादर करताना तारेवरची कसरत करावी लागली आहे. या अर्थसंकल्पामध्ये कर वाढीचा किंवा इतर कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त भार नागरिकांवर घालण्यात आला नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पाचे सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी जोरदार स्वागत केले.

जमा होणारा कर, शुल्क

अंदाजे खर्च

अंदाजे भांडवली खर्च

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article