महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुंबईचा उत्तराखंडवर विश्वविक्रमी विजय

06:30 AM Jun 10, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रणजी करंडक : 725 धावांनी मात, धवल कुलकर्णी-मुलानी-कोटियन यांचे प्रत्येकी 3 बळी

Advertisement

वृत्तसंस्था /बेंगळूर

Advertisement

स्थानिक क्रिकेटमध्ये बलाढय़ मानल्या जाणाऱया मुंबईने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम नोंदवताना रणजी करंडक उपांत्यपूर्व लढतीच्या चौथ्या दिवशी उत्तराखंडचा तब्बल 725 धावांनी धुव्वा उडविला आणि सर्वोच्च फरकाने विजय मिळविण्याचा 92 वर्षांचा विक्रम त्यांनी मोडित काढत नवा विश्वविक्रम नोंदवला. पहिल्या डावात 252 धावांची खेळी करणाऱया सुवेद पारकरला सामनावीराचा बहुमान मिळाला.

ऑस्ट्रेलियातील शेफील्ड शील्ड क्रिकेट स्पर्धेत क्वीन्सलँडने 92 वर्षांपूर्वी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर 685 धावांनी विजय मिळवित विश्वविक्रम नोंदवला होता. मुंबईने तो विक्रम गुरुवारी मागे टाकत नवा विक्रम नोंदवला.

रणजी करंडक क्रिकेटमध्ये बंगालच्या नावावर सर्वाधिक फरकाने विजय नोंदवण्याचा विक्रम होता. 1953-54 या मोसमात बंगालने ओडिशावर 540 धावांनी विजय नोंदवला होता. तो भारतीय विक्रमही मुंबईने मागे टाकला. आदल्या दिवशी बंगालनेही 129 वर्षांचा जुना विक्रम मोडित काढत रणजी करंडक स्पर्धेत नवा विक्रम नोंदवला होता. त्यांच्या 9 फलंदाजांनी अर्धशतके नोंदवत हा विक्रम नोंदवला.

41 वेळा रणजी स्पर्धा जिंकणाऱया मुंबईने पहिल्या दिवसापासूनच या सामन्यात उत्तराखंडवर वर्चस्व राखले होते. त्यांनी दुसरा डाव 3 बाद 216 धावांवर घोषित करून उत्तराखंडला विजयासाठी 794 धावांचे अशक्यप्राय आव्हान दिले. 

उत्तराखंडचा पहिला डाव 114 धावांत आटोपला होता आणि मुंबईच्या भेदक माऱयासमोर दुसऱया डावातही त्यांचा केवळ 69 धावांत खुर्दा झाला.

मुंबईचा अनुभवी गोलंदाज धवल कुलकर्णीने 11 धावांत 3, स्पिनर शम्स मुलानीने 15 धावांत 3, ऑफस्पिनर तनुष कोटियनने 13 धावांत 3 बळी मिळविले. याशिवाय मोहित अवस्थीनेही एक बळी मिळविला. उत्तराखंडच्या शिवम खुराणाने सर्वाधिक नाबाद 25 तर कुणाल चंदेलाने 21 धावा जमविल्या.

संक्षिप्त धावलफक : मुंबई 8 बाद 647 डाव घोषित, 3 बाद 216 डाव घोषित (शॉ 72, जैस्वाल 103, आदित्य तरे 57, दिक्षांशू नेगी 1-31), उत्तराखंड 114 व 69 (शिवम खुराना नाबाद 35, कुणाल चंदेला 21, धवल कुलकर्णी 3-11, तुषार कोटियन 3-13, मुलानी 3-15).

बंगालकडून प्रथमश्रेणीतील 129 वर्षांचा विक्रम मोडित, डावात 9 अर्धशतके!

बंगालच्या रणजी संघाने झारखंडविरुद्ध गुरुवारी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 129 वर्षांचा जुना विक्रम मागे टाकत नवा जागतिक विक्रम नोंदवला. त्यांच्या तब्बल 9 फलंदाजांनी अर्धशतके किंवा त्याहून अधिक धावा जमवित 8 बाद 773 धावांचा डोंगर उभारला. कर्णधार अभिमन्यू ईश्वरन (65), अभिषेक रमण (61), सुदीप घरामी (186), अनुष्टुप मजुमदार (117), मनोज तिवारी (73), अभिषेक पोरेल (68), शाहबाज अहमद (78), सायन शेखर मोंडल (नाबाद 53), आकाश दीप (नाबाद 53) यांचा या विक्रमात सहभाग होता. यातील आकाश दीपने 8 षटकारांची बरसात करीत 18 चेंडूत 53 धावा झोडपल्या. झारखंडने पहिल्या डावात 298 धावा जमविल्या. त्यात विराट सिंगच्या नाबाद 113 व नदीम सिद्दिकीच्या 53 धावांचा समावेश आहे. सायन मोंडल व शाहबाद अहमद यांनी प्रत्येकी 4 बळी मिळविले. बंगालने फॉलोऑन न देता दुसऱया डावात दिवसअखेर 3 बाद 76 धावा जमविल्या होत्या.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article