For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुंबईचा आजपासून विदर्भशी उपांत्य सामना

06:57 AM Feb 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
मुंबईचा आजपासून विदर्भशी उपांत्य सामना
Advertisement

जखमी जैस्वाल मुकणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नागपूर

मुंबईचा रणजी चषक स्पर्धेतील विदर्भविरुद्धचा उपांत्य फेरीतील सामना आज सोमवारपासून येथे सुरू होत असून त्यात जखमी यशस्वी जैस्वाल खेळण्याची शक्यता कमीच असली, तरी गतविजेत्या मुंबईचे पारडे जड राहणार आहे.

Advertisement

जैस्वाल लवकरच त्याच्या दुखापतीची अधिक तपासणी करण्यासाठी बेंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये जाऊ शकतो, कारण त्याला भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघासाठीच्या बिगरप्रवासी राखीव खेळाडूंत समाविष्ट करण्यात आलेले आहे. हा सामना म्हणजे गेल्या वर्षीच्या अंतिम सामन्याची पुनरावृत्ती असून त्यातील जैस्वालची अनुपस्थिती मुंबईची ताकद कमी करणार नाही. मुंबईकडे कर्णधार अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि शार्दुल ठाकूर असे अनेक स्टार खेळाडू आहेत जे सामन्याची दिशा बदलण्याची ताकद बाळगतात. काही यशस्वी खेळाडूंच्या उपस्थितीपेक्षा 42 वेळा विजेत्या राहिलेला संघाचा दृढनिश्चय त्यांना वेगळा बनतो.

या हंगामात अनेकदा मुंबईची वरची फळी अपयशी ठरली, पण ठाकूर आणि तनुश कोटियनसारख्या त्यांच्या खालच्या फळीतील फलंदाजांनी त्यांना सावरले. हरियाणाविऊद्धच्या क्वॉर्टरफायनलमध्येही त्यांची अवस्था 7 बाद 113 अशी झाली होती. पण त्यानंतर शम्स मुलानी आणि कोटियन यांनी आठव्या यष्टीसाठी 183 धावांची भागीदारी करत मुंबईला वाचवले. नागपूरची खेळपट्टी ही अनेकदा फलंदाजांना साथ देणारी राहिली असून त्यावर बडे खेळाडू मुबलक धावा काढतील अशी मुंबईला आशा आहे.

खालच्या फळीतील खेळाडूंकडून झालेला प्रतिकार प्रभावी असला, तरी मुंबईला विदर्भविऊद्ध त्यांच्या वरच्या फळीकडून अधिक सशक्त प्रयत्नांची अपेक्षा असेल. विदर्भ या हंगामात जोरदार फॉर्ममध्ये राहिलेला आहे. त्यांच्या गोलंदाजी विभागात मोठी नावे नाहीत, परंतु हर्ष दुबे, यश ठाकूर, आदित्य ठाकरे आणि नचिकेत भूते यांनी विदर्भासाठी सातत्याने चांगली गोलंदाजी केली आहे.

डावखुरा फिरकी गोलंदाज दुबे या रणजी हंगामात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे आणि त्याने 59 बळी मिळविलेले आहेत. त्यामुळे मुंबईच्या प्रसंगी डळमळणाऱ्या वरच्या फळीचा कमजोरीचा फायदा घेऊन विदर्भ त्यांना सुऊवातीलाच दबावाखाली आणण्यास उत्सुक असेल. या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या आघाडीच्या 20 फलंदाजांमध्ये मुंबईचा एकही फलंदाज नाही. सिद्धेश लाड (565 धावा) हा त्यांचा सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज असून तो या यादीत 22 व्या स्थानावर आहे.

याउलट या हंगामात विदर्भची आघाडीची फळी खूपच चांगल्या स्थितीत दिसली आहे. कारण यश राठोड (728 धावा) हा सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. याशिवाय कऊण नायर (591) आणि कर्णधार अक्षय वाडकर (588) यांनीही चांगली कामगिरी केलेली आहे. तथापि त्यांना सलामीवीर अथर्व तायडे आणि ध्रुव शोरे यांच्याही चांगल्या कामगिरीची गरज भासेल.

संघ-मुंबई : अजिंक्य रहाणे (कर्णधार), आयुष म्हात्रे, अंगकृष्ण रघुवंशी, अमोघ भटकळ, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल (जखमी), सिद्धेश लाड, शिवम दुबे, आकाश आनंद, हार्दिक तामोरे, सूर्यांश शेडगे, शार्दुल ठककर, शार्दुल ठाकूर, शम्स मुलानी, तनुष कोटियन, मोहित अवस्थी, सिल्व्हेस्टर डिसोझा, रॉयस्टन डायस, अथर्व अंकोलेकर, हर्ष तन्ना.

विदर्भ : अक्षय वाडकर (अकर्णधार), अथर्व तायडे, अमन मोखाडे, यश राठोड, हर्ष दुबे, अक्षय कामेवार, यश कदम, अक्षय वखारे, आदित्य ठाकरे, दर्शन नळकांडे, नचिकेत भूते, सिद्धेश वाठ, यश ठाकूर, दानिश मालेवार, पार्थ रेखाडे, करुण नायर, ध्रुव शोरे.

सामन्याची वेळ : सकाळी 9.30 वा.

Advertisement
Tags :

.