For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डळमळीत हैदराबादसमोर आज मुंबईचे आव्हान

06:52 AM Apr 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
डळमळीत हैदराबादसमोर आज मुंबईचे आव्हान
Advertisement

वृत्तसंस्था/ हैदराबाद

Advertisement

खराब कामगिरी करणारा सनरायझर्स हैदराबादचा संघ आज बुधवारी येथे आत्मविश्वास वाढलेल्या मुंबई इंडियन्सचा सामना करताना पुनरागमनाची आशा बाळगेल आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्यांच्या मोहिमेला पुनऊज्जीवित करण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेला विजय मिळविण्याकडे लक्ष देईल. सात सामन्यांतून फक्त दोन विजयांसह हैदराबाद हताश परिस्थितीत आहे. त्यांच्या दमदार फलंदाजीने त्यांना अनेकदा निराश केले असून त्यांचे गोलंदाजही कोणताही ठसा उमटवताना दिसत नाही.

हैदराबाद हा एका पठडीतला संघ आहे हे त्यांनी संथ आणि चेंडू वळणाऱ्या खेळपट्ट्यांवर ज्या पद्धतीने संघर्ष केला आहे त्यावरून सिद्ध झाले आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाने दोनदा घरच्या मैदानावरही पराभव पत्करलेला आहे. मुंबईमध्ये वानखेडेवर मुंबईविरुद्ध चार गड्यांनी झालेला पराभव हा आव्हानात्मक परिस्थितीत त्यांच्या कमकुवतपणा उघडा पडण्याचे सर्वांत अलीकडील उदाहरण आहे. हैदराबादचे फलंदाज पाटा खेळपट्टीवर जबरदस्त कामगिरी करतात आणि त्यामुळे मोठी धावसंख्या उभी राहते असे दिसून आले आहे. मुंबईविरुद्ध आज अनुकूल खेळपट्टी मिळणार असल्याने त्यांना काही प्रमाणात गती मिळविण्याची सर्वोत्तम संधी असेल.

Advertisement

हैदराबादच्या विजयाची संधी डावखुऱ्या सलामी जोडीवर अवलंबून असल्याने मुंबईविरुद्ध आज अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यासमोर आव्हान असेल. पॉवरप्लेमधील त्यांचे यश संघाचे भविष्य निश्चित करते. पंजाब किंग्सविऊद्धच्या सामन्यात अभिषेकने 55 चेंडूंत 141 धावा काढत आयपीएलमधील सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या नोंदवली होती. तथापि, हेडबद्दल काही चिंता असतील, कारण तो नेहमीप्रमाणे खेळत नाही. आज पराभव झाल्यास हैदराबादची परिस्थिती कठीण होईल. शिवाय त्यांना मुंबई इंडियन्सविऊद्धची कामगिरी लक्षात घेऊनही सावध राहावे लागेल. हैदराबादने मुंबईविरुद्धचे 24 पैकी 10 सामने जिंकले आहेत, तर 14 सामने गमावले आहेत.

मुंबई इंडियन्ससाठी रविवारी मुंबईत लखनौ सुपर जायंट्सचा सामना करण्यापूर्वी दूरस्थ सामन्यात आपले पुनरागमन बळकट करण्याची ही एक उत्तम संधी आहे. मुंबई इंडियन्सने सलग तीन विजयांसह आयपीएलमधील त्यांची निराशाजनक सुऊवात मागे टाकली आहे. फलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर त्यांनी चेन्नई सुपर किंग्सचा 9 गडी राखून मोठा पराभव केलेला आहे. रोहित शर्माच्या नाबाद 76 धावा आणि सूर्यकुमार यादवच्या नाबाद 68 धावा यांनी मुंबईचे हे दोन्ही आधारस्तंभ फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले आहेत.

तिलक वर्माला चेन्नईविऊद्ध फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही, पण हा डावखुरा फलंदाज उत्तम फॉर्ममध्ये आहे, तर नमन धीरने कर्णधार हार्दिक पंड्यासोबत फिनिशर म्हणून आपली प्रगती दाखवली आहे. बळी घेण्याच्या बाबतीत जसप्रीत बुमराह त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये नाही, पण भारताचा हा गोलंदाज अचूक मारा करण्याच्या बाबतीत उत्तम कामगिरी करू लागला आहे. येथील मैदानाच्या स्वरूपाचा निकालावर परिणाम होऊ शकतो. कारण हैदराबादने येथील पाटा खेळपट्टीवर दोन विजय मिळवलेले आहेत आणि यापूर्वी राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्सविऊद्धच्या सामन्यांमध्ये मोठी धावसंख्या उभारलेली आहे.

संघ-सनरायझर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), इशान किशन, अथर्व तायडे, अभिनव मनोहर, अनिकेत वर्मा, सचिन बेबी, स्मरण रविचंद्रन, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, हर्षल पटेल, कामिंदू मेंडिस, वियान मुल्डर, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रे•ाr, मोहम्मद शमी, राहुल चाहर, सिमरजित सिंग, झीशान अन्सारी, जयदेव उनाडकट, इशान मलिंगा.

मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रॉबिन मिन्झ, रायन रिकल्टन, श्रीजीथ कृष्णन, बेव्हन जेकब्स, तिलक वर्मा, नमन धीर, विल जॅक्स, मिशेल सँटनर, राज अंगद बावा, विघ्नेश पुथूर, कॉर्बिन बॉश, ट्रेंट बोल्ट, कर्ण शर्मा, दीपक चाहर, अश्वनी कुमार, रीस टोपले, व्ही. एस. पेनमेत्सा, अर्जुन तेंडुलकर, मुजीब उर रहमान, जसप्रीत बुमराह.

सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.

Advertisement
Tags :

.