कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वानखेडेवर मुंबईचा मुकाबला आज चेन्नईशी

06:55 AM Apr 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

धोनीवर राहील लक्ष

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज रविवारी गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जची गाठ मुंबई इंडियन्सशी पडणार असून यावेळी दिग्गज महेंद्रसिंग धोनी याच्यावर साऱ्यांचे लक्ष असेल. कारण प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमवरील हा त्याचा अंतिम सामना असू शकतो. सीएसकेच्या कर्णधारपदाविना निव्वळ एक खेळाडू म्हणून धोनी प्रथमच वानखेडेवर खेळताना दिसणार आहे. हा बहुदा त्याचा शेवटचा आयपीएल हंगाम आहे.

42 व्या वर्षीही धोनीचे यष्टिरक्षण निर्दोष आहे. परंतु सीएसकेला त्याच्या रणनीतीसंदर्भातील कौशल्याची या मोसमातील निराशाजनक कामगिरी सुधारण्यास मदत होईल, अशी आशा आहे. त्यांना दोन पराभवांचा सामना करावा लागला. आहे. सीएसकेने मुंबईविरुद्धच्या गेल्या पाच सामन्यांमधले चार विजय मिळविलेले आहेत. आयपीएलच्या या दोन सर्वांत यशस्वी संघांमधील ही लढत चुरसपूर्ण ठरण्याची अपेक्षा आहे.

मुंबईच्या आक्रमक फलंदाजीचा तडाखा आज सीएसकेच्या गोलंदाजांना करावा लागू शकतो. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबईला धक्कादायक सुऊवातीनंतर सूर सापडलेला आहे. त्यांच्या फलंदाजांनी गेल्या दोन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि ‘आरसीबी’विऊद्ध सूर्यकुमार यादवचे 17 चेंडूंत अर्धशतक हा सीएसकेच्या गोलंदाजांसाठी धोक्याचा इशारा आहे. इशान किशन (161 धावा) आणि रोहितची सलामीची भागीदारी किती मजल मारते तेही आज महत्त्वपूर्ण ठरेल.

दुसरीकडे, चेन्नईचा कर्णधार गायकवाडने धावांची लयलूट केलेली नसली, तरी डावाची उभारणी करण्यात तो गाजावाजा न करता महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो. त्यांच्याकडे आघाडीला रचिन रवींद्र, मधल्या फळीत डॅरिल मिशेल आणि शिवम दुबे (176 धावा), तर डेथ ओव्हर्समध्ये रवींद्र जडेजा आणि धोनी अशी भक्कम फळी आहे. चेन्नईला हे देखील माहीत असेल की, कुशल जसप्रीत बुमराहची (10 बळी) षटके खेळून काढणे आणि मुंबईच्या उर्वरित गोलंदाजांवर हल्ला करणे हे उपयुक्त ठरेल. कारण इतर गोलंदाजांनी भरपूर धावा दिल्या आहेत. ‘सीएसके’च्या माऱ्याचा विचार करता घरच्या मैदानावर खेळणाऱ्या शार्दुल ठाकूर व तुषार देशपांडे यांच्यावर बरेच काही अवलंबून राहणार असले, तरी जास्त लक्ष हे मुस्तफिझूर रेहमान (9 बळी) आणि चतुर जडेजा यांच्यावर राहील.

मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, जसप्रीत बुमराह, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, टीम डेव्हिड, श्रेयस गोपाल, इशान किशन, अंशुल कंबोज, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, क्वेना मफाका, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, नमन धीर, शिवलिक शर्मा, रोमॅरियो शेफर्ड, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, तिलक वर्मा, विष्णू विनोद, नेहल वढेरा, ल्यूक वुड.

चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एम. एस. धोनी, अरावेली अवनीश, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मोईन अली, शिवम दुबे, आर. एस. हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय जाधव मंडल, डॅरिल मिशेल, रचिन रवींद्र, मिशेल सँटनर, निशांत सिंधू, दीपक चहर, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मुस्तफिझूर रेहमान, मथीशा पाथिराना, सिमरजित सिंग, प्रशांत सोळंकी, शार्दुल ठाकूर, महीश थीक्षाना, समीर रिझवी.

सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article