कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वानखेडेवर मुंबईने उडवला केकेआरचा धुव्वा

06:58 AM Apr 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

 मुंबईचा 8 गड्यांनी दणदणीत विजय : रिकल्टनची नाबाद अर्धशतकी खेळी : सामनावीर अश्वनी कुमारचे पदार्पणातच  4 बळी

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

सूर्यकुमार यादवचा षटकार, अश्वनी कुमारचे 4 विकेट्स, रायन रिकेल्टनचे आक्रमक अर्धशतक या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएल 2025 मधील पहिला विजय मिळवला. पहिल्या विजयासाठी आसुसलेल्या मुंबईने अचूक गोलंदाजी करत केकेआरला 116 धावांत ऑलआऊट केले. यानंतर विजयासाठीचे लक्ष्य मुंबईने 8 विकेट्स आणि 43 चेंडू राखत हा सामना सहजपणे जिंकला आणि आपले विजयाचे खाते उघडले. विशेष म्हणजे, आयपीएलमधील पहिला सामना खेळणाऱ्या युवा अश्वनी कुमारने 24 धावांत 4 बळी घेण्याची किमया केली. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

केकेआरने वानखेडेच्या मैदानावर दिलेल्या 117 धावांच्या छोट्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात मुंबईने सावध सुरुवात केली. रोहित शर्माने एक षटकार खेचला खरा पण तो पुन्हा एकदा फेल ठरला. रोहित 13 धावांवर आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर रायन रिकेल्टनने 41 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकारांसह 62 धावांची खेळी साकारत संघाचा विजय साकार केला. विल जॅक्सने 16 धावांचे योगदान दिले. त्याला रसेलने तंबूचा रस्ता दाखवला.

सूर्याची फटकेबाजी

वानखेडेच्या मैदानावर सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा फॉर्मात परतला आणि त्याच्या वादळी फटकेबाजीचा एक नमुना पाहायला मिळाला. सूर्यकुमार यादव गेल्या काही काळात फॉर्मात नव्हता, पण वानखेडेच्या मैदानावर उतरताच सूर्याने आपली वादळी खेळी केली. सूर्याने 300 च्या स्ट्राईक रेटने 9 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 27 धावांची खेळी केली आणि संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. रिकेल्टन व सूर्याच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर मुंबईने अवघ्या 12.5 षटकांत विजय मिळवला. केकेआरकडून आंद्रे रसेलला दोन विकेट घेण्यात यश मिळाले.

केकेआरचे सपशेल लोटांगण

स्टेडियमवर मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो योग्य सिद्ध केला. पॉवरप्लेमध्ये केकेआरच्या टॉप-4 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यात मुंबईच्या गोलंदाजांना यश आले. केकेआरच्या डावाची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टने सुनील नरेनला (1) तंबूचा रस्ता दाखवला तर पुढील षटकात दीपक चहरने डी कॉकला (0) माघारी धाडले. यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेही फार काळ मैदानावर टिकला नाही. 11 धावा काढून तो अश्वनी कुमारच्या गोलंदाजीवर बाद झाला. विशेष म्हणजे, आयपीएल कारकिर्दीतील पहिलाच सामना खेळणाऱ्या अश्वनी कुमारने पहिल्याच चेंडूवर रहाणेला बाद करण्याचा पराक्रम केला. रहाणेपाठोपाठ वेंकटेश अय्यरही स्वस्तात बाद झाल्याने पॉवरप्लेमध्ये केकेआरची 4 बाद 41 अशी स्थिती होती.

अंगक्रिश रघुवंशीने सर्वाधिक 16 चेंडूत 26 धावा केल्या. रमणदीप सिंगने 22 धावांचे योगदान दिले. इतर केकेआरचे फलंदाज मात्र सपशेल अपयशी ठरले. पदार्पण करणाऱ्या अश्वनी कुमारने रिंकू सिंग (17), मनीष पांडे (19) आणि आंद्रे रसेल (5) यांना आऊट करून कोलकाता नाईट रायडर्सचे कंबरडे मोडले. यानंतर पेकेआरचा संघ 16.2 षटकांत 116 धावांत ऑलआऊट झाला. मुंबईकडून अश्वनी कुमारने सर्वाधिक चार गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

केकेआर 16.2 षटकांत सर्वबाद 116 (डी कॉक 1, सुनील नरेन 0, अजिंक्य रहाणे 11, रघुवंशी 26, वेंकटेश अय्यर 3, रिंकू सिंग 17, मनीष पांडे 19, रमणदीप सिंग 22, अश्वनी कुमार 24 धावांत 4 बळी, दीपक चहर 2 बळी, बोल्ट, सँटेनर व हार्दिक पंड्या प्रत्येकी एक बळी)

मुंबई इंडियन्स 12.5 षटकांत 2 बाद 121 (रोहित शर्मा 13, रिकल्टन 41 चेंडूत 4 चौकार व 5 षटकारासह नाबाद 62, विल जॅक्स 16, सूर्यकुमार यादव 9 चेंडूत नाबाद 27, आंद्रे रसेल 2 बळी).

विद्यमान विजेते तळाशी

43 चेंडू शिल्लक असताना विजय मिळवून मुंबईने पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ केली आहे. दोन गुण आणि 0.309 च्या नेट रन रेटसह, मुंबई सहाव्या स्थानावर पोहोचली तर विद्यमान विजेत्या केकेआरचा संघ दहाव्या स्थानावर घसरला आहे. त्याच्या खात्यात निश्चितच दोन गुण आहेत पण केकेआरचा नेट रन रेट -1.428 झाला आहे. आयपीएल 2025 च्या पॉइंट्स टेबलमध्ये सध्या आरसीबी अव्वल स्थानावर आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article