मुंबई रणजी संघ जाहीर
वृत्तसंस्था/ मुंबई
2025 च्या क्रिकेट हंगामातील सुरु असलेल्या रणजी स्पर्धेतील गुरुवारी येथे होणाऱ्या इलाईट गट-1 मधील मेघालयविरुद्धच्या सामन्यासाठी विद्यमान विजेत्या मुंबई संघाची घोषणा करण्यात आली. अजिंक्य रहाणेकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
मुंबई संघाला मेघालयविरुद्धच्या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजयाची नितांत गरज आहे. 16 जणांच्या मुंबई संघामध्ये रघुवंशी, सूर्यांश शेडगे आणि अथर्व अंकोलेकर यांचे पुनरागमन झाले आहे. दरम्यान रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल आणि श्रेयस अय्यर यांना मात्र संघात स्थान देण्यात आले नाही. गेल्या आठवड्यात या स्पर्धेतील झालेल्या सामन्यात जम्मू काश्मिरने मुंबईचा 5 गड्यांनी पराभव केला होता. 6 फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात वनडे मालिका सुरु होणार असल्याने जैस्वाल, अय्यर आणि रोहित शर्मा हे या सामन्यात खेळू शकणार नाहीत. मुंबई संघाला या स्पर्धेत जेतेपद राखण्यासाठी मेघालयविरुद्धच्या सामन्यात बोनस गुणासह मोठा विजय मिळविणे गरजेचे आहे.
मुंबई संघ - अजिंक्य रहाणे (कर्णधार), आयुष म्हात्रे, रघुवंशी, अमोघ भटकळ, सिद्धेश लाड, आकाश आनंद, हार्दिक तमोरे, एस. शेडगे, शार्दुल ठाकुर, शम्स मुलानी, तनुष कोटीयन, मोहित अवस्थी, एस. डिसोझा, रॉयस्टन डायस, श्रेयस गुरव आणि अथर्व अंकोलेकर.