For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुंबईला 213 धावांची आघाडी

06:00 AM Feb 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुंबईला 213 धावांची आघाडी
Advertisement

वृत्तसंस्था /कोलकाता

Advertisement

2024 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथील इडन गार्डन्स मैदानावर सुरू असलेल्या इलाईट ब गटातील सामन्यात शनिवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर मुंबईने यजमान बंगालवर 213 धावांची भक्कम आघाडी मिळवली. या सामन्यात मुंबईने 6 बाद 330 या धावसंख्येवरून दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि मुंबईचे शेवटची चार गडी 82 धावांची भर घालत तंबूत परतले. मुंबईच्या पहिल्या डावात एस. शेडगेने 12 चौकारासह 71, कर्णधार शिवम दुबेने 1 षटकार आणि 12 चौकारासह 72, कोटीयानने 1 षटकार आणि 9 चौकारासह 67, अंकोलेकरने 2 षटकार आणि 5 चौकारासह 46 तर शेवटच्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला रॉयस्टन डायसने 43 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारासह नाबाद 46 धावा झळकवल्या. पृथ्वी शॉने 5 चौकारासह 35 धावा केल्या. बंगालतर्फे सुरज जैस्वालने 124 धावात 6 गडी तर मोहमद कैफने दोन गडी बाद केले. त्यानंतर बंगालच्या पहिल्या डावात अनुस्तुप मुजुमदारने एकाकी लढत देत शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 127 चेंडूत 3 षटकार आणि 12 चौकारांच्या मदतीने नाबाद 108 धावा झळकवल्या. कर्णधार मनोज तिवारीने 5 चौकारासह 36, पोरलने 2 चौकारांसह 13, करण लालने 2 चौकारांसह 14 धावा केल्या. मुंबईच्या अचूक गोलंदाजीसमोर बंगालाचा पहिला डाव 56 षटकात 199 धावात आटोपला. मुंबईतर्फे मोहित अवस्तीने 63 धावात 3 तर रॉयस्टन डायस, शिवम दुबे यांनी प्रत्येकी 2 तसेच धवल कुलकर्णी आणि कोटीयान यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक

Advertisement

मुंबई प. डाव सर्वबाद 412 (शेडगे 71, दुबे 72, कोटीयान 67, अंकोलेकर 46, डायस नाबाद 46, शॉ 35, सुरज जैस्वाल 6-124, कैफ 2-67), बंगाल प. डाव 56 षटकात सर्वबाद 199 (अनुस्तुप मुजुमदार नाबाद 108, मनोज तिवारी 36, अवस्ती 3-63, डायस आणि दुबे प्रत्येकी दोन बळी, कुलकर्णी आणि कोटीयान प्रत्येकी एक बळी).

Advertisement
Tags :

.