मुंबई इंडियन्सचा आज लखनौशी मुकाबला
वृत्तसंस्था/लखनौ
इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज शुक्रवारी मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार असून यावेळी भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि रिषभ पंत हे आपल्या खराब फॉर्ममधून बाहेर पडण्याची आशा बाळगून मैदानात उतरतील. पाच वेळचे विजेते मुंबई इंडियन्स या हंगामात आतापर्यंत फारशी चांगली कामगिरी करू शकलेले नाहीत. तीन सामन्यांतून त्यांनी फक्त दोन गुण मिळवले आहेत. भारतीय कर्णधार रोहितच्या फलंदाजीच्या फॉर्ममुळे मुंबई संघाचे व्यवस्थापन अडचणीत आले आहे. एलएसजी कर्णधार पंतचीही हीच परिस्थिती आहे. दोन्ही संघ तीन सामन्यांतून प्रत्येकी एका विजयासह जवळजवळ सारख्याच स्थानावर असल्याने आजच्या परिस्थितीत कोण चांगले खेळतो यावर सारे काही अवलंबून राहणार आहे.
वानखेडेवर केकेआरविऊद्ध मुंबईने अखेर प्रभावी कामगिरी केली आणि दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक रायन रिकेल्टनने त्यांना कमी धावसंख्येच्या पाठलागात विजय मिळवून दिला. रोहित आणि ‘मिस्टर 360 डिग्री’ सूर्यकुमार यादव यांना मोठी भूमिका बजवावी लागणार असून त्यांची फलंदाजी फळी लांबलचक नाही, परंतु त्यांच्याकडे संथ आणि वेगवान गोलंदाजांचा एक चांगला विभाग आहे आणि ते प्रभावी कामगिरी करू शकतात. मुंबईच्या मागे सहाव्या स्थानावर असलेल्या लखनौ सुपर जायंट्सने विशाखापट्टणम येथे झालेल्या आयपीएलच्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविऊद्धच्या एका गड्याने झालेल्या निराशाजनक पराभवानंतर खरोखरच फारशी प्रगती केलेली नाही.
लखनौ सुपर जायंट्स् : रिषभ पंत (कर्णधार), अब्दुल समद, आकाश दीप, आकाश सिंग, आवेश खान, आयुष बडोनी, मॅथ्यू ब्रीट्झके, युवराज चौधरी, राजवर्धन हंगरगेकर, हिम्मत सिंग, शामर जोसेफ, आर्यन जुयाल, अर्शिन कुलकर्णी, एडन मार्करम, मिचेल मार्श, डेव्हिड मिलर, निकोलस पूरन, प्रिन्स यादव, दिग्वेश राठी, रवी बिश्नोई, शाहबाज अहमद, मणिमारन सिद्धार्थ, शार्दुल ठाकूर, मयंक यादव.
मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), अश्वनी कुमार, राज बावा, कॉर्बिन बॉश, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, दीपक चाहर, विल जॅक्स, बेव्हन जेकब्स, रॉबिन मिन्झ, मुजीब उर रहमान, नमन धीर, विघ्नेश पुथूर, सत्यनारायण राजू, रायन रिकल्टन, मिचेल सँटनर, कर्ण शर्मा, रोहित शर्मा, कृष्णन श्रीजीथ, अर्जुन तेंडुलकर, तिलक वर्मा, रीस टोपले, सूर्यकुमार यादव.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.