महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुंबई हाफ मॅरेथॉन उद्या

06:14 AM Aug 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / मुंबई

Advertisement

2024 सालातील मुंबई हाफ मॅरेथॉन रविवार दि. 25 ऑगस्ट रोजी आयोजित केली असून या मॅरेथॉनमध्ये सुमारे 20 हजार धावपटू सहभागी होतील. मुंबई हाफ मॅरेथॉनचे उद्घाटन भारताचा माजी कसोटीवीर सचिन तेंडुलकरच्या हस्ते केले जाणार आहे.

Advertisement

रविवारी बांदरा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथून पहाटे 5 वाजता या हाफ मॅरेथॉनला प्रारंभ होणार आहे. महिलांच्या विभागात सुमारे 6 हजार धावपटू सहभागी होणार आहेत. मुंबई हाफ मॅरेथॉन 10 कि.मी. पल्ल्याची असून त्यामध्ये 8 हजार धावपटूंनी आपली नावे नोंदविली आहेत. तर 21 कि.मी. पल्ल्याच्या शर्यतीमध्ये 4 हजार धावपटूंनी अधिकृत नाव नोंदणी केली आहे. महाराष्ट्रातील अव्वल धावपटू सहभागी होत आहेत. 5 कि.मी. पल्ल्याच्या टप्प्यामध्ये 5 हजार धावपटू तर 3 कि.मी. पल्ल्याच्या टप्प्यात किमान 3 हजार धावपटू सहभागी होणार आहेत. भारतीय नौदलातील 1500 धावपटू यामध्ये भाग घेणार आहेत. शारीरिक तंदुरुस्ती ही मुंबई हाफ मॅरेथॉनचे उद्दिष्ट असल्याचे सचिनने पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article