मुंबईसमोर आज दिल्लीच्या फिरकी माऱ्याचे आव्हान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मुंबई इंडियन्सला आज रविवारी होणाऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना करावा लागणार आहे. यावेळी दिल्लीच्या प्रभावी फिरकीपटूंच्या त्रिकुटासमोर रोहित शर्मा आपल्याला सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल. रोहित फॉर्मसाठी झगडत असताना, मुंबई त्यांचे घातक शस्त्र जसप्रीत बुमराहवर अवलंबून असेल. बुमराहचे आव्हान के. एल. राहुल कसा पेलतो ते पाहावे लागणार आहे. असे असले, तरी दिल्ली कॅपिटल्सचे या सामन्यात पारडे जड राहणार आहे.
यजमान संघ सलग पाचवा विजय नोंदविण्याचे लक्ष्य बाळगून आहे, तर हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबईला सहापैकी पाच सामन्यांत पराभव स्वीकारावा लागलेला आहे. संकटाच्या काळात चाहते त्यांच्या आवडत्या स्टार खेळाडूंनी चांगले योगदान द्यावे अशी अपेक्षा करतात आणि रोहितने त्या दृष्टीने चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे. पण आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यांमध्ये त्याने फक्त 38 धावा केल्या आहेत. दिल्लीच्या जबरदस्त फिरकीपटूंचा समावेश असलेल्या माऱ्याला तोंड देणे हे त्याला सोपे जाणार नाही. यात कुलदीप यादवला नवोदित विप्रज निगमची चांगली साथ मिळत आहे. कर्णधार अक्षर आतापर्यंत बळीशिवाय राहिलेला असला, तरी दिल्ली कॅपिटल्सचा हा कर्णधार पुन्हा एकदा रोहितविऊद्ध गोलंदाजीची सुऊवात करू शकतो. मुंबईसाठी रोहितबरोबर तिलक वर्मा आणि उपकर्णधार सूर्यकुमार यादव यांचे अपयश हाही एक मोठा मुद्दा ठरला आहे.
पुन्हा फिट झालेला बुमराह तीन महिन्यांनी त्याचा पहिला सामना खेळूनही लय हरवल्यागत दिसला नाही. त्यामुळे दिल्लीच्या वरच्या फळीला आतापर्यंत त्यांनी ज्याला तोंड दिले आहे त्यापेक्षा यावेळी थोडे कठीण आव्हान असेल. जेक फ्रेझर-मॅकगर्क पूर्णपणे सूर हरवल्यागत दिसत आहे. परंतु त्याचा संघावर परिणाम झालेला नाही, कारण त्यांना चारपैकी दोन सामन्यांमध्ये मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करा लागलेला नाही. शार्दुल ठाकूर, प्रिन्स यादव, मुकेश चौधरी किंवा भुवनेश्वर कुमारचा सामना करणे आणि बुमराहला तोंड देणे यात खूप फरक आहे. या हंगामातील दिल्ली कॅपिटल्सचा हा घरच्या मैदानावरील पहिलाच सामना आहे.
संघ-मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, तिलक वर्मा, ट्रेंट बोल्ट, नमन धीर, रॉबिन मिन्झ, कर्ण शर्मा, रायन रिकल्टन, दीपक चाहर, अल्लाह गझनफर, विल जॅक्स, अश्वनी कुमार, मिचेल सँटनर, रीस टोपले, कृष्णन श्रीजीथ, राज अंगद बावा, सत्यनारायण राजू, बेव्हॉन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर, लिझाद विल्यम्स, विघ्नेश पुथूर.
दिल्ली कॅपिटल्स : अक्षर पटेल (कर्णधार), फाफ डु प्लेसिस, कऊण नायर, समीर रिझवी, जेक फ्रेझर-मॅकगर्क, आशुतोष शर्मा, के. एल. राहुल, अभिषेक पोरेल, डोनोवन फेरेरा, ट्रिस्टन स्टब्स, माधव तिवारी, त्रिपुराना विजय, मानवंथ कुमार, विपराज निगम, अजय मंडल, दर्शन नळकांडे, मुकेश कुमार, मोहित शर्मा, टी. नटराजन, मिचेल स्टार्क, दुष्मंथा चमीरा, कुलदीप यादव.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.