महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुंबई-बेंगळूर व्हाया पुणे प्रवास आता अधिक वेगवान

06:36 AM Sep 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अटल सेतूपासून बेंगळूरपर्यंत नवा महामार्ग : सहा महिन्यात कामाला सुरुवात : नितीन गडकरी

Advertisement

पुणे : प्रतिनिधी

Advertisement

मुंबई-बेंगळूर व्हाया पुणे हा प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे. मुंबई ते पुणे मार्गावरील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी पुण्याच्या रिंगरोड लगत मुंबई-बेंगळूर महामार्ग जोडण्यात येणार आहे. 14 पदरी असलेल्या या महामार्गाच्या कामाची निविदा काढली असून, येत्या सहा महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात रविवारी दिली.

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ (सीओईपी टेक) आणि सीओईपी माजी विद्यार्थी संघटना यांच्यावतीने देण्यात येणारा ‘सीओईपी अभिमान पुरस्कारा’चे वितरण गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त साजरा होत असलेल्या अभियंतादिनी हा सोहळा झाला. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नियामक मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ उद्योजक डॉ. प्रमोद चौधरी, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुनील भिरूड, कुलसचिव डॉ. दयाराम सोनवणे, मानद सचिव डॉ. सुजीत परदेशी, सीओईपी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भरत गीते आदी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, राज्यात सार्वजनिक बांधकाममंत्री असताना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग पुढील पन्नास वर्षांचा विचार करून बांधण्यात आला होता. मात्र आता हा महामार्ग अपुरा पडत आहे. त्यामुळे अटल सेतूपासून बेंगळूरपर्यंत नवा महामार्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहने शहरात न येता बाहेरूनच जाणार असल्याने शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल. तसेच हाच मार्ग छत्रपती संभाजीनगर रस्त्यालाही जोडला जाणार आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.

सरकारी अधिकाऱ्यांची मिश्कीलपणे ‘हजेरी’

गडकरी यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. समाजात जातींमध्ये वाद असतात तसे प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये तुकडीचे वाद असतात. प्रकल्पांचे सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) चुकीच्या पद्धतीने केले जातात. त्यामुळे प्रचंड अपघात होतात, लाखो लोक जखमी होतात. प्रशासनात दिवट्यांचे बाप आहेत. फाईलवर जेवढे वजन टाकाल, तेवढ्या पटापट कामे होतात. अधिकाऱ्यांचे पत्नीपेक्षा फाईलवर अधिक प्रेम असते. म्हणून ते तीन-तीन महिने काहीही न करता फाईल स्वत:जवळ ठेवतात, अशी मिश्कील टिप्पणी गडकरी यांनी केली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article