महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

डॉ. के.ब.हेडगेवार विद्यालयात मुक्तिदिन उत्साहत

11:54 AM Dec 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पर्ये : डॉ. केशव बळीराम हेडगेवार विद्यामंदिरात गोवा मुक्तीदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. श्रीकांत जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर सर्वांनी राष्ट्रगीत व ध्वजगीत म्हटले. मुख्याध्यापक सदानंद मिशाळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्रीकांत जोशी यांनी मागदर्शन केले. ध्येयपूर्तीसाठी अथक परिश्रम करा, जिद्द ,चिकाटी आणि मेहनत करण्यात मागे राहू नका, असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे श्रीकांत जोशी यांनी केले. आठवीचा विद्यार्थी जय जयंत काणेकर आणि पाचवीचा विद्यार्थी कविश फडते बेतकीकर यांनी विचार व्यक्त केले. पालक शिक्षक संघाच्या अध्यक्ष राधिका कामत सातोस्कर, पूर्व प्राथमिक विभागाच्या अध्यक्ष सुचिता शेंदुरे, शाळेच्या व्यवस्थापन समितीचे कोषाध्यक्ष उल्हास केरकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विद्यार्थिनी विहा राणे सरदेसाई हिने केले तर. एंजल सूर्यवंशी हिने आभार मानले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article