मुकेश अंबानींना मार्क झुकरबर्गने टाकले मागे
झुकरबर्ग यांची संपत्ती 1 दिवसात 81.77 हजार कोटीपर्यंत वाढली : 12 व्या क्रमाकांवर
नवी दिल्ली :
मेटा कंपीनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांची संपत्ती गुरुवारी 27 एप्रिल रोजी 10 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 81.77 हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे. या वाढीसह झुकरबर्गची एकूण संपत्ती 77.1 अब्ज डॉलर्स म्हणजेच 6.30 लाख कोटी रुपयांवरून 87.3 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. म्हणजे सुमारे 7.13 लाख कोटी रुपये इतकी झाली आहे.
फेसबुकच्या पहिल्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) उत्कृष्ट निकाल आले आहेत, त्यानंतर मेटाचा हिस्सा वाढला आहे. या तेजीचा परिणाम झुकरबर्गच्या नेटवर्थवर दिसून आला आहे. शेवटच्या दिवशी, मेटाचा स्टॉक 13.93 टक्क्याच्या वाढीसह 238.56 डॉलरवर बंद झाला.
झुकेरबर्ग 12 व्या स्थानावर
मेटाच्या शेअरमध्ये वाढ झाल्यामुळे मार्क झुकेरबर्ग ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकात मुकेश अंबानींना मागे टाकून 12 व्या स्थानावर पोहोचले आहेत. याआधी झुकरबर्ग 13व्या क्रमांकावर होते. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी 82.4 अब्ज डॉलर (अंदाजे रु. 6.73 लाख कोटी) संपत्तीसह 13व्या स्थानावर पोहोचले आहेत.
वापरकर्त्यांच्या संख्येचा परिणाम
सक्रिय वापरकर्त्यांची संख्या वाढतअसताना, अधिक जाहिराती प्राप्त होतात बुधवारी जाहीर झालेल्या निकालांमध्ये मेटाने सांगितले की फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सक्रिय वापरकर्त्यांची संख्या वाढली कारण कंपनीला अधिक जाहिराती मिळाल्या. यामुळे या तिमाहीत मेटाचा महसूल 28.6 अब्ज डॉलर झाल्याचे स्पष्ट केले आहे. यात मागील वर्षीच्या तुलनेत 3 टक्के अधिक नफा झाल्याची माहिती आहे.
इंस्टाचा प्रभाव
रील्समुळे इंस्टाग्रामवर लोकांचा वेळ 24टक्क्यांनी वाढला आहे.झुकरबर्गची संपत्ती 11.6 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे एकेकाळी मार्क झुकरबर्गची एकूण संपत्ती 142 अब्ज डॉलर्स म्हणजे 11.6 लाख कोटी रुपये होती.