For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपाप्रणित महायुती सरकारविरूध्द काँग्रेसचे चिखल फेको आंदोलन

07:50 PM Jun 22, 2024 IST | Abhijeet Khandekar
भाजपाप्रणित महायुती सरकारविरूध्द काँग्रेसचे चिखल फेको आंदोलन
ANDOLAN
Advertisement

सरकारच्या प्रतिमेला चिखल लावून काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन
सांगली प्रतिनिधी

Advertisement

राज्यातील जनता अनेक समस्यांचा सामना करत असताना महाभ्रष्ट भाजपाप्रणित महायुती सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. या सरकारने जनतेला वार्‍यावर सोडून दिले आहे. या महाभ्रष्ट,

िनष्क्रीय नष्क्रीय सरकारच्या िवरोधात सांगली काँग्रेस पक्षाने काँग्रेस भवनासमोर आज सरकारच्या प्र ितमेस िचखल माखून िचखल फेको’ आंदोलन करून भाजपाप्रणित सरकारचा जोरदार िनषेध केला. महायुती शासनाचा िनषेधाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले, राज्यातील जनतेत या महायुती सरकारबद्दल तीव्र असंतोष धुमसत आहे. त्याची झलक लोकसभेच्या िननवडणुकीत िदसली. महायुतीच्या पराभवाचा तो ट्रेलर होता. िवधानसभेतील त्यांच्या पराभवाचा िपक्चर अभी बाकी आहे, असे त्यांनी सांगितले.
महागाई, बेरोजगारी, नीट परीक्षा घोटाळा, खते व िबयाणांचा काळाबाजार, घरगुती वापराच्या वीज िबलातील भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. शासकीय व शाळा महािवद्यालयांतील पूर्णवेळ शंभर टक्के नोकर भरती केली जात नाही. स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाहीत, ह्या परीक्षा घेतल्या तर पेपरफुटीचे ग्रहण लागते, शेतकरी संकटात आहे पण त्यांना मदत िदली जात नाही.
कांदा, कापूस, सोयाबीन यासह कोणत्याही शेतमालाला भाव नाही, सरकार एमएसपी देत नाही. का†ठण काळात जनतेला मदत करण्याऐवजी सरकार जनतेचे शोषण व आर्थिक िपळवणूक करत आहे. नीट परीक्षेच्या पेपरफुटी व िनकालातील गैरव्यवहारामुळे लाखो िवद्यार्थ्यांचे भ िवष्य सरकारने धोक्यात आणले आहे.
यावेळी ग्रामीण िजल्हाध्यक्ष आमदार िवक्रमसिंह सावंत, प्रा. डॉ. िसकंदर जमादार, माजी नगरसेवक अय्याज व नायकवडी, मयूर पाटील, अल्ताफ पेंढारी, इलाही बाऊदवाले, ताैिफफ िशकलगार, िवजय आवळे, उत्तम सुर्यवंशी, संगाप्पा पाटोळे, योगेश राणे, तुकाराम माळी जत, बाबासाहेब कोडग, पारेकर, महावीर पाटील, माऊती पवार, मोहन माने पाटील, जे. बी. पाटील, सी. आर. सांगलीकर, आनंदराव पाटील, संतोष भोसले, सदािशव खाडे, नामदेव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, संभाजी पाटील, अशोकदादा पाटील नागठाणे, िबपीन कदम, रविंद्र वळवडे, प्रा. एन. डी. िबरनाळे, डॉ. प्रताप भोसले, अऊण गवंडी, सुखराजसिंगण, सनी धोतरे, प्रशांत देशमुख, अजय देशमुख, आयुब िनशाणदार, प्रशांत आहवळे, अरविंद जैनापुरे, िवक्रम कांबळे, ढोले यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.