एम.एस. धोनीचे ड्रोन पायलट प्रशिक्षण पूर्ण
वृत्तसंस्था / चेन्नई
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी चेन्नईमधील गरुड एरोस्पेसच्या डीजीसीए-मान्यताप्राप्त रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन (आरपीटीओ) येथे ड्रोन पायलट प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले.
चेन्नईस्थित गरुड एरोस्पेसमध्ये ब्रँड अॅम्बॅसेडर आणि गुंतवणूकदार असलेला माजी भारतीय कर्णधार महेंद्र सिंग धोनीने आता प्रमाणित ड्रोन पायलट बनून या फर्मशी आपला संबंध घनिष्ट करताना आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. गरुड एरोस्पेसचे संस्थापक आणि सीईओ अग्निश्वर जयप्रकाश म्हणाले, एके दिवशी आम्ही सहज गप्पा मारत होतो तेव्हा मी सांगितले की, आम्ही मोठ्या संख्येने ड्रोन पायलटना प्रशिक्षण दिले आहे. धोनीने लगेच म्हटले मीही ड्रोन पायलट होऊ शकतो का? ही चर्चा सुमारे दीड वर्षापूर्वी झाली होती आणि जरी त्याचे वेळापत्रक खूप व्यस्त असले तरी त्याने अखेर पायलट प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले.