मोठ्या पडद्यावर दिसणार अंगूरी भाभी अन् विभूति
भाभी जी घर पर हैं’वर येणार चित्रपट
भारतीय टीव्हीजगतातील काही अत्यंत कमी शोंनी प्रेक्षकांना सातत्याने हसविले असून यात ‘भाभीजी घर पर हैं’ सामील आहे. घराघरात लोकप्रिय याच्या व्यक्तिरेखा आता पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर धमाल करणार आहेत. निर्मात्यांनी या शोवर आधारित चित्रपट ‘भाभी जी घर पर हैं- फन ऑन द रन’ या चित्रपटाची घोषणा केली असून हा फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे.
या शोमधील व्यक्तिरेखा विभूति नारायण मिश्रा, तिवारी जी, अंगूरी भाभी आणि अनिता भाभी आता मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. याचबरोबर हप्पू सिंहची विनोदी शैली आणि सक्सेना जी यांची विचित्र कृत्येही प्रेक्षकांना पुन्हा हसविणार आहेत. चित्रपटाची निर्मिती झी सिनेमा आणि एडिटद्वारे केले जातेय. याच्या प्रदर्शनाची तारीख 6 फेब्रुवारी 2026 रोजी निश्चित करण्यात आली आहे. चित्रपटाच्या घोषणेसह याचे पोस्टर आणि काही छायाचित्रेही शेअर करण्यात आली आहेत. या चित्रपटात शोमधील मूळ कलाकारांसाब्sात काही नवे चेहरेही जोडले गेले आहेत. चित्रपटात आसिफ शेख (विभूति), रोहिताश्व गौर (तिवारी जी) आणि शुभांगी अत्रे (अंगूरी भाभी) पूर्वीप्रमाणेच स्वत:च्या व्यक्तिरेखा साकारणार आहेत. याचबरोबर रवि किशन, मुकेश तिवारी आणि निरहुआ (दिनेश लाल यादव) देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसून येतील.