For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसची कार्यकारिणी विसर्जित

04:56 PM Dec 21, 2024 IST | अनुजा कुडतरकर
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसची कार्यकारिणी विसर्जित
Advertisement

प्रदेशाध्यक्षापदी सौ.संध्या लाखे पदावर कायम

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सर्व राज्य, जिल्हा आणि ब्लॉक स्तरीय समित्या तत्काळ प्रभावाने विसर्जित करण्यात आल्या असून प्रदेशाध्यक्षा पदी सौ.संध्या लाखे या पदावर कायम राहून नवीन समित्या निवड प्रक्रियेचे त्या नेतृत्व करणार आहेत. भारतीय महिला काँग्रेस अध्यक्षा अल्का लांबा यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सर्व राज्य, जिल्हा आणि ब्लॉक स्तरीय समित्या तत्काळ प्रभावाने विसर्जित करण्यात आल्या आहेत. संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी आणि महाराष्ट्रातील महिला काँग्रेसच्या सदस्यत्व मोहिमेला गती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील महिला काँग्रेसची सदस्यत्व मोहीम पुढे नेण्यासाठी आणि नारी न्याय सभासदत्व सत्कार समारंभ आयोजित करणे आणि महिला काँग्रेस संघटनेच्या उभारणीसाठी सौ.संध्या लाखे यांच्या सोबत खालील विधानसभा क्षेत्रातील महिला पदाधिकारी सहकार्य करणार आहेत. १) दिपाली लालाजी मिसाल - संभाजीनगर २) आयशा असलम खान - ठाणे ३) डॉ. अंजलि पी. ठाकरे -अमरावती ४) सुनीता गवांडे- रामटेक ५) सीमा विनोद सहारे - गडचिरोली चिमूर ६) स्वाति राजेश जाधव - नाशिक ७) श्रीमती साक्षी एस. वंजारी -सिंधुदुर्ग ८) सीमा महेश आहूजा - कल्याण ९) सुषमा शरदचंद्र राजेघोरपडे - सातारा.

Advertisement

Advertisement
Tags :

.