For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सौ.अनुराधा पाटकर यांचे निधन

11:36 AM Aug 09, 2024 IST | अनुजा कुडतरकर
सौ अनुराधा पाटकर यांचे निधन
Advertisement

कणकवली

Advertisement

कणकवली येथील रहिवासी सौ. अनुराधा सुरेश पाटकर ,(वय 77) यांचे आज शुक्रवार 9 ऑगस्ट रोजी आकस्मिक आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, जावई ,नातवंडे असा परिवार आहे. कणकवली येथील निवृत्त जि. परिषद अधीक्षक सुरेश पाटकर यांच्या त्या पत्नी होत. तर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या कर्मचारी सौ . निता प्रभू आणि महिला बालकल्याण आय सी.डी.एस मुख्य सेविका सौ.गीता पै- पाटकर यांच्या त्या मातोश्री होत. त्या मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. कणकवली तालुक्यातील नागवे येथील महिलांना संघटित करून विविध उपक्रम पार पाडण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. सौ.अनुराधा यांच्या या आकस्मिक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement
Advertisement

.