For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडी , सिंधुदुर्गनगरी ,कणकवली रेल्वेस्थानकाचे उद्या लोकार्पण

05:29 PM Aug 08, 2024 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडी   सिंधुदुर्गनगरी  कणकवली रेल्वेस्थानकाचे उद्या लोकार्पण
Advertisement

सावंतवाडी प्रतिनिधी

Advertisement

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्थसंकल्पातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी , सिंधुदुर्गनगरी कणकवली या तीन रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. जवळपास 25 कोटी रुपये खर्च करून या तीनही रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण पूर्ण झाले आहे. या कामाचा लोकार्पण सोहळा उद्या शुक्रवारी 9 ऑगस्ट ला सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. या कार्यक्रमाला खासदार नारायण राणे, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर ,आमदार नितेश राणे ,आमदार वैभव नाईक ,आमदार निरंजन डावखरे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा पाटणकर म्हैसकर ,सचिव सदाशिव साळुंखे ,संजय दसपुते, कोकण रेल्वे कार्पोरेशन व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा , मुख्य अभियंता शरद राजभोज ,जिल्हाधिकारी किशोर तावडे आदी उपस्थित राहणार आहेत. एकाच दिवशी तीनही रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरणाचे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते होणार आहे. कणकवली स्थानकाचा लोकार्पण सोहळा सकाळी 10:30 वाजता, त्यानंतर बारा वाजता सिंधुदुर्गनगरी व दुपारी ३ वाजता सावंतवाडी स्थानक टर्मिनसच्या सुशोभीकरणाचे लोकार्पण सोहळा होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रेल्वे सुशोभीकरणाचे काम अवघ्या वर्षभराच्या आधीच पूर्ण करून येत्या गणेश चतुर्थीला मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांसाठी या माध्यमातून रेल्वे स्थानके दर्जेदार बनवली आहेत. ही रेल्वे स्थानक म्हणजे एअरपोर्टच्या धर्तीवर तयार करण्यात आली आहेत. सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र केणी व कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सर्वगोड यांच्या माध्यमातून ही रेल्वे स्थानके सुशोभीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तिन्ही रेल्वे स्थानकांच्या सुशोभीकरणाचे कार्यक्रमाच्या निमित्ताने परिसरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. रेल्वे स्थानके सजवण्यात आली आहेत. तरी सर्वांनी या तिन्ही रेल्वे स्थानकांच्या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.