For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मृणाल हेब्बाळकरांचा विजय निश्चित

11:20 AM Apr 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
मृणाल हेब्बाळकरांचा विजय निश्चित
Advertisement

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना विश्वास : ग्रामीण मतदारसंघात प्रचार

Advertisement

बेळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराला गेलेल्या ठिकापणी मतदारांकडून मिळणारा प्रतिसाद पाहिल्यास काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर हे दोन लाखांपेक्षा अधिक मताधिक्यांनी निवडून येतील, हे निश्चित आहे, असा विश्वास महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केला. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बिजगर्णी, कावळेवाडी, राकसकोप, बेळवट्टी, बडस, बाकनूर, येळेबैल आदी गावांमध्ये भेटी देऊन प्रचार केला. यावेळी त्या बोलत होत्या. 2013 पासून या मतदारसंघातील मतदारांशी आपला संबंध आहे. तेव्हापासून मतदारांनी आपली साथ दिली आहे. यावेळी लोकसभा उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनाही साथ द्यावी व सर्वाधिक मताधिक्यांनी निवडून आणावे, असे आवाहन त्यांनी केले. स्थानिक उमेदवाराला प्राधान्य द्यावे. बाहेरील उमेदवाराला योग्य धडा शिकवावा, असेही त्यांनी सांगितले. केवळ निवडणुकीसाठी येणाऱ्या भाजपच्या उमेदवारांना मतदार योग्य धडा शिकवतील. शहरासाठी आलेल्या योजना धारवाडला वळवून स्थानिकांवर अन्याय केला आहे, याची जाणिव ठेवून मतदारांनी मतदान करावे. काँग्रेस उमेदवारालाच पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. बिजगर्णी, कावळेवाडी आणि राकसकोप येथील ग्रामस्थांकडून एकत्रितपणे 19 वर्षांनंतर लक्ष्मी यात्रा भरविण्यात आली आहे. सदर गावांना भेट देऊन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, मृणाल हेब्बाळकर यांनी देवीचे दर्शन घेतले. यावेळी ग्रामस्थांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी युवराज कदम, इंदू पाटील, सिद्धाप्पा कंग्राळकर, बाबुराव मोरे, धाकलू पाटील, येळेबैल येथील मल्लाप्पा मरगाळी, परशराम पाटील, तानाजी मोरे, महेश पाटील आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.