कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘एमआरएफ’च्या नफ्यात 31 टक्क्यांची वाढ

06:22 AM May 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

भारतातील सर्वात उच्च मूल्याच्या स्टॉकपैकी एक असलेल्या एमआरएफ लिमिटेडने 7 मे रोजी त्यांच्या गुंतवणूकदारांसाठी 2290 टक्के इतका मोठा लाभांश जाहीर केला आहे. यासोबतच, कंपनीने 2025 च्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचे निकालही जाहीर केले.  निकाल जाहीर होण्यापूर्वी कंपनीचे समभाग हे घसरणीत व्यवहार करत होते आणि कंपनीने निकाल जाहीर करताच, समभागांमध्ये वाढ दिसून आली. एकावेळेपर्यंत, कंपनीचे समभाग हे 3.97 टक्क्यांनी वाढून 1,40,265 रुपयांवर व्यवहार करत होते.

Advertisement

लाभांश घोषणा का?

लाभांशाची गणना स्टॉकच्या दर्शनी मूल्यावरून केली जाते. एमआरएफचे दर्शनी मूल्य 10 रुपये आहे आणि त्यांनी प्रति शेअर 229 रुपये लाभांश जाहीर केला आहे. म्हणून, या शेअरवर त्याच्या दर्शनी मूल्याच्या तुलनेत 229 रुपये लाभांश जाहीर करण्यात आला.कंपनीने अद्याप लाभांश देयकासाठी रेकॉर्ड तारीख जाहीर केलेली नाही. मागील आर्थिक वर्षासाठी प्रति समभाग 3 रुपये असे दोन अंतिम लाभांश जाहीर केले आहेत आणि दिले आहेत. ट्रेंडलाइनच्या आकडेवारीनुसार, गेल्या 12 महिन्यांत एमआरएफने प्रति शेअर 200 रुपये लाभांश जाहीर केला आहे. एमआरएफ 1,40,000 च्या समभागाच्या किंमतीचा विचार करता एमआरएफचा लाभांश उत्पन्न 0.15 टक्के आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article