महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘एमआरएफच्या समभागांची किंमत विक्रमी 1.5 लाख रुपयांवर

07:00 AM Jan 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कंपनीची सुऊवात खेळणी, फुगे बनविण्यापासून : कंपनीने रचला इतिहास

Advertisement

वृत्तसंस्था /मुंबई 

Advertisement

भारतातील सर्वात मोठी बहुराष्ट्रीय टायर निर्मिती कंपनी मद्रास रबर फॅक्ट्री अर्थात एमआरएफच्या समभागाने इतिहास रचला आहे. एमआरएफच्या समभागाने  (17 जानेवारी) बुधवारी ट्रेडिंग सत्रात 1.5 लाख रुपयांचा विक्रमी टप्पा ओलांडला. असे करणारी एमआरएफ ही भारतातील पहिली कंपनी ठरली आहे. समभागाने 1,50,254.16 रु. चा आतापर्यंतचा उच्चांक केला या समभागाने  ट्रेडिंग सत्रादरम्यान 1,50,254.16 रु.चा सार्वकालिक उच्चांक आणि 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तथापि, एमआरएफ समभागामध्ये नंतर घसरण झाली, 1.46 टक्के खाली, 1,34,600.05 रुपयांवर बंद झाला. ट्रेडिंग सत्राच्या सुरुवातीला त्याचे समभाग 1,35,870 रुपयांवर उघडले. बुधवारी, एमआरएफ शेअर्स 1.46 टक्केच्या घसरणीसह 1,34,600.05 रुपयांवर बंद झाले.

वर्षात समभागात 50 टक्के वाढ

एक दिवस आधी म्हणजे मंगळवारी (16 जानेवारी) एमआरएफचे समभाग 1,36,684 रुपयांवर बंद झाले होते. गेल्या एका वर्षात या स्टॉकमध्ये 50 टक्के इतकी वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत त्याने आपल्या गुंतवणूकदारांना 31.64 टक्के आणि 1 महिन्यात 12.71 टक्के परतावा दिला आहे. कंपनीचे बाजार भांडवल 57.29 हजार कोटी रुपये आहे.

एमआरएफ स्टॉक इतका महाग का आहे?

कंपनीचे समभाग कधीही विभाजित न करणे हे त्यामागचे कारण आहे. अहवालानुसार,एमआरएफने 1975 पासून कधीही त्याचे समभाग विभाजित केले नाहीत. त्याच वेळी, एमआरएफने 1970 मध्ये 1:2 आणि 1975 मध्ये 3:10 च्या प्रमाणात बोनस शेअर जारी केले होते.

 75 पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात 

भारतातील टायर उद्योगाची बाजारपेठ सुमारे 60,000 कोटी रुपयांची आहे. जेके टायर अँड इंडस्ट्रीज लिमिटेड आणि सियाट टायर्स हे एमआरएफचे स्पर्धक आहेत. एमआरएफचे भारतात 2,500 पेक्षा जास्त वितरक आहेत. एवढेच नाही तर ही कंपनी जगातील 75 हून अधिक देशांमध्ये निर्यात करते.

एमआरएफने खेळण्यांचे फुगे बनवून सुरुवात केली

चेन्नईस्थित एमआरएफ कंपनीचे पूर्ण नाव मद्रास रबर फॅक्टरी आहे. या कंपनीने 1946 मध्ये खेळण्यांचे फुगे बनवून उद्योगाची सुरुवात केली. कंपनीने 1960 पासून टायर्सचे उत्पादन सुरू केले. आता ही कंपनी भारतातील सर्वात मोठी टायर उत्पादक आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article