For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सांसदीय ‘दीर्घायुष्य’ लाभलेले खासदार

06:29 AM Apr 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
सांसदीय ‘दीर्घायुष्य’ लाभलेले खासदार
Advertisement
  1. इंद्रजीत गुप्ता : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे हे नेते सर्वाधिक 11 वेळा लोकसभेवर निवडून आलेले होते. त्यांचा संसदीय कालखंड 1960 ते 2001 असा होता. केवळ 1977 मध्ये एकदाच पराभव झाला होता. त्यांनी वायव्य कोलकाता, अलिपूर, बशीरहाट आणि मिदनापूर या पश्चिम बंगालमधील मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केले होते. ते देवेगौडा यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय गृहमंत्री होते.

Advertisement

  1. अटलबिहारी वाजपेयी : तीन वेळा पंतप्रधान होण्याचा मान मिळालेले, प्रथम भारतीय जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पक्षाचे नेते असलेले अटलबिहारी वाजपेयी 10 वेळा लोकसभेत निवडून आले होते. 1975 ते 1971 या कालावधीत उत्तर प्रदेशातील बलरामपूर, 1971 ते 1977 या कालावधीत मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर, 1977 ते 1984 या कालावधीत नवी दिल्ली आणि 1991 ते 2009 या कालावधीत त्यांनी उत्तर प्रदेशातील लखनौ मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांचा 1984 मध्ये ग्वाल्हेर मतदारसंघातून पराभव झाला होता.

  1. सोमनाथ चॅटर्जी : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या या नेत्याने 10 वेळा लोकसभा गाठली होती. त्यांचे पिता हिंदू महासभेचे ज्येष्ठ नेते असूनही त्यांनी मार्क्सवाद स्वीकारला होता. ते 2004 ते 2009 या काळात लोकसभेचे अध्यक्षही होते. 1971 ते 2009 या कालखंडात त्यांनी वर्धमान, जाधवपूर आणि बोलपूर या पश्चिम बंगालमधील मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केले. अणुकराराचे समर्थन केल्याने त्यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने निलंबित केले होते.

Advertisement

  1. पी. एम. सईद : काँग्रेस नेते पी. एम. सईद 1967 ते 2004 या कालावधीत सलग 10 वेळा लक्षद्वीप मतदारसंघातून लोकसभेवर निवडले गेले होते. 2005 मध्ये ते केंद्रीय ऊर्जा मंत्री होते. त्याच वर्षी त्यांचे निधन झाले होते.

  1. कमलनाथ : काँग्रेस नेते कमलनाथ हे मध्यप्रदेशातील छिंदवाडा मतदारसंघातून सलग 9 वेळा 1980 ते 2014 या कालखंडात लोकसभेवर निवडून गेले होते. ते केंद्रीय मंत्रीही होते. नंतर ते मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री होते.

  1. जॉर्ज फर्नांडिस : समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस 9 वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांनी मोरारजी देसाई, अटलबिहारी वाजपेयी आदी पंतप्रधानांच्या काळात उद्योग, रेल्वे आणि संरक्षण अशी खाती सांभाळली. त्यांनी बिहारच्या मुझफ्फरपूर आणि नालंदा या मतदारसंघांचे प्रतिधित्व केले होते.

  1. गिरिधर गामांग : हे काँग्रेसचे नेते ओडीशाच्या कोरापूट मतदारसंघातून 9 वेळा लोकसभेवर निवडले केले होते. ते ओडीशाचे मुख्यमंत्रीही काही काळ होते. ओडीशा विधानसभेचे सदस्य असताना ते लोकसभेवर निवडून आले होते. त्यांच्या मतामुळे 1998 मध्ये वाजपेयी सरकारचा संसदेत पराभव झाला होता.

  1. माधवराव सिंदिया : मध्यप्रदेशातील पूर्वाश्रमीच्या राजघराण्याचे हे वारस प्रथम जनसंघाचे आणि नंतर काँग्रेसचे नेते होते. ते 9 वेळा लोकसभेचे सदस्य होते. त्यांनी रेल्वे, पर्यटन, नागरी विमानवाहतूक आणि मानवबळ अशी खाती सांभाळली.

  1. खगपती प्रधानी : हे ओडीशातील काँग्रेस नेते होते. ते याच राज्याच्या नवरंगपूर मतदारसंघातून 9 वेळा लोकसभेवर निवडले गेले. पण त्यांना केंद्रीय मंत्रीपद कधीच मिळाले नाही. सत्ताधारी पक्षाचे नऊ वेळा खासदार असूनही मंत्रिपद न मिळालेले ते कदाचित प्रथमच खासदार असावेत असे बोलले जाते.

  1. राम विलास पास्वान : जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतून निर्माण झालेले हे प्रसिद्ध दलित नेते होते. ते 8 वेळा बिहारमधून लोकसभेत निवडले गेले. त्यांनी 1977 च्या लोकसभा निवडणुकीत हाजीपूर मतदारसंघातून 89.30 टक्के मते मिळविण्याचा विक्रम केला होता. तो आजही अबाधित आहे. त्यांनी विश्वनाथ प्रतापसिंग, देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहनसिंग अशा अनेक पंतप्रधानांच्या काळात मंत्रिपदे भूषविली. हाही विक्रम त्यांच्या नावावर आहे.
Advertisement

.