For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चेंबर ऑफ कॉमर्सला खासदार शेट्टर यांची भेट

10:30 AM Jun 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
चेंबर ऑफ कॉमर्सला खासदार शेट्टर यांची भेट
Advertisement

बेळगाव : बेळगावचे नूतन खासदार जगदीश शेट्टर यांनी शुक्रवारी उद्यमबाग येथील बेळगाव चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उद्योजकांशी संवाद साधला. लघु उद्योजक, तसेच इतर उद्योजकांच्या समस्या जाणून घेतल्या. बेळगाव-पुणे इंटरसिटी, बेळगाव-बेंगळूर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करणे, याबरोबरच कोल्हापूर, धारवाड, व्हाया निपाणी रेल्वेमार्ग सुरू करण्याची मागणी खासदारांकडे करण्यात आली. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सी. सी. होंडदकट्टी, उद्योजक सचिन सबनीस, नितीन लांडगे, डीआयसीचे प्रमुख सत्यनारायण भट यांच्यासह इतर उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.