गोवा-हैदराबाद महामार्गाबाबत खा.शेट्टर यांची अधिकाऱ्यांशी चर्चा
12:24 PM Nov 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : गोवा-हैदराबाद महामार्गाच्या बाजूने सेवा रस्ता तयार करणे व रामदुर्ग तालुक्यातील तोरणगट्टी गावानजीक 5 मीटर उंचीचा सेतू बांधण्याबाबत खासदार जगदीश शेट्टर यांनी बागलकोट विभाग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे योजना संचालक पवन गुरव यांच्याशी नुकतीच चर्चा केली. गोवा-हैदराबाद नूतन महामार्ग बैलहोंगल तालुक्यातील लक्कुंडी, भावीहाळ, जे. के. कोप्प, मुर्कीभावी, इंचल या गावाजवळून जाणार आहे. तेथील शेतकऱ्यांना शेतवडीकडे जाण्यासाठी अनुकूल होण्याच्यादृष्टीने चर्चा करून काम हाती घेण्याची सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकर च्या अधिकाऱ्यांना केल्याचे खासदारांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
Advertisement
Advertisement