For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ग्रामपंचायतीच्या निवडणूकीनंतर जल्लोष हास्यास्पद; दम असेल तर महापालिकेच्या निवडणुका घ्या

04:14 PM Nov 07, 2023 IST | Abhijeet Khandekar
ग्रामपंचायतीच्या निवडणूकीनंतर जल्लोष हास्यास्पद  दम असेल तर महापालिकेच्या निवडणुका घ्या
Sanjay Raut
Advertisement

अनाड्यांचं सरकार आहे असं म्हणावं लागेल. हे अनाडी घोडे उधळलेले आहेत. मुख्यमंत्री शिंदे काय बोलतात याकडे महाराष्ट्र गांभीर्याने पाहत नाही. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतरचे फटाके घटनाबाह्य सरकार वाजवत असून ते फुसके फटाके आहेत. अशी जोरदार टिका शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर महायुतीला यश मिळाले. त्यावर येत्या काळात महायुतीचेच सरकार असल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. तसेच राज्यभरात महायुतीकडून जल्लोष झाल्यानंतर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी ही टीका केली आहे.

Advertisement

आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, "प्रत्येक जण ग्रामपंचायत निकालाचे आकडे आपापल्या बाजूने दाखवत आहेत....आम्ही कसे जिंकलो आणि विरोधक कसे हरले, हे दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे एक मूर्खपणा आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्ष आणि चिन्हावर लढवल्या जात नाहीत. आणि ही गोष्ट जर घटनाबाह्य सरकारला माहीत नसेल तर सरकारमधील लोक अनाडी असून हे अनाड्यांचं सरकार आहे. आता हे अनाडी घोडे उधळलेले आहेत." असे म्हणून संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला.

पुढे बोलताना ते म्हणाले, "जे राजकीय पक्ष विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका घ्यायला घाबरतात. त्यांची हातभर फाटते. त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालावर दावा सांगणे हे हास्यास्पद आहे. तसेच जे 14 महापालिकांच्या निवडणुका घेत नाहीत ते सांगतात आम्ही ग्रामपंचायत निवडणुका जिंकलो. तुम्ही सिनेट आणि मुंबई महापालिकासह इतर 14 महापालिकांच्या निवडणुका घ्या आणि मग सांगा कोण जिंकलं कोण हरलं? ते काही आकडे सांगू दे त्यांना आकडा लावायची सवय आहे. त्यांचे आता फक्त आकड्यांचेच खेळ चालू आहेत." असं संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Advertisement

मराठा समाजाच्या सरसकट आरक्षणावरून बोलताना संजय राऊत म्हणाले, "हा सगळा विषय अत्यंत नाजूक आणि गंभीर असून जातीपातीच्या नावावर राज्य फोडण्याचा एक षडयंत्र आहे. या राज्यात राजकीय अस्थिरता राहावी यासाठी प्रयत्न केला जात आहे. ज्यामुळे या ठिकाणचा रोजगार उद्योग हे इतर राज्यामध्ये जावेत. यासाठीच हे टाकलेले डाव आहेत. आपल्या राज्यकर्त्यांनी या डावांमध्ये फसू नये. या राज्यामध्ये सामाजिक एकता राहावी, यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावेत. अशी शिवसेनेची भूमिका आहे." असंही ते म्हणाले.

Advertisement
Tags :

.